शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोहाली MMS कांड: ट्रूकॉलरने भांडाफोड केली, पोलिसांनी मोबाईल नंबर टाकताच, हादरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 4:31 PM

1 / 6
मोहाली एमएमएस कांड आता वेगळी दिशा घेऊ लागला आहे. विद्यापीठातील तरुणींचे व्हिडीओ सापडू लागले असून हे प्रकरण आता वाढत चालले आहे. आरोपींचा मोबाईल नंबर जेव्हा पोलिसांनी ट्रूकॉलरवर टाकला तेव्हा त्याखालील मेसेज पाहून पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. फेब्रुवारीपासून या आरोपींनी अनेक महिलांना फोन केल्याचे समोर आले आहेत.
2 / 6
चंदीगढच्या विद्यार्थीनींना ज्या नंबरवरून तुमचे व्हिडीओ आहेत, असे धमकीचे फोन आलेत त्या नंबरचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यावेळी हा नंबर पोलिसांनी ट्रू कॉलर या अॅपवर टाकला असता त्यांना हा नंबर स्कॅमरच्या श्रेणीत गेल्याचे दिसले आहे. या नंबरवर अनेक लोकांनी ब्लॅकमेल करणारा असे मेसेज टाकले आहेत. हे मेसेज फेब्रुवारीपासून पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हा आरोपी महिलांना व तरुणींना लक्ष्य करून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे आता यात सायबर सेलदेखील लक्ष घालू लागला आहे.
3 / 6
चंदीगढ विद्यापीठ व्हिडीओ लीकप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता. आरोपी विद्यार्थीनी ज्या नंबरला हे व्हिडीओ पाठवत होता, तो नंबर एफआयआरमध्ये दाखल करण्यात आला आहे. ट्रू कॉलरवर एका युजरने हा नंबर ब्लॅकमेल मेसेज आणि कॉलिंगवाल्यांचा असल्याचे म्हटले आहे.
4 / 6
दुसऱ्या युजरने देखील १९ जूनला असाच मेसेज टाकला आहे. माझ्यासोबतही असाच प्रकार होत आहे, कोणी याला ओळखता का? असे या युजरने विचारले आहे. अन्य एका युजरने म्हटलेय की हा व्यक्ती माझ्या पत्नीला फोन करत आहे. अशाप्रकारे अनेक युजर्सनी या नंबरला ब्लॅकमेलर असे म्हटले आहे.
5 / 6
आरोपीच्या Truecaller प्रोफाइलमध्ये आतापर्यंत 55 जणांनी त्याला स्कॅमर म्हटले आहे, तर Truecaller रेकॉर्डनुसार, या व्यक्तीने गेल्या दोन महिन्यांत असे 135 कॉल केले आहेत. यापैकी बहुतेक कॉल हे दुपारी 3:00 ते 6:00 पर्यंत होते. या संदर्भात पोलीस आरोपींचीही चौकशी करत आहेत. या साऱ्या प्रकरणात पोलिसांकडून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
6 / 6
हे Android आणि iPhone मध्ये वापरता येणारे थर्ड पार्टी कॉलिंग आणि मेसेजिंग अॅप आहे. याद्वारे कोणताही युजर कॉल आणि मेसेज करू शकतो. तसेच, या अॅपद्वारे कोणत्याही मोबाइल नंबरच्या युजरचे नाव, त्याचा व्यवसाय आणि पत्ता यासारखे प्रोफाइल देखील तपासता येते. यामुळे आपल्याला कोण फोन करतोय, त्याचा उद्देश आदी गोष्टी समजतात. आजकाल स्पॅम कॉल, मेसेजचे प्रमाण वाढले आहे. कर्ज घ्या, क्रेडीट कार्ड घ्या, ही ऑफर घ्या... असे अनेक फोन येतात. युजर याद्वारे अशा कॉलपासून लांब राहू शकतात.
टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी