Mohan Delkar Suicide: Abhinav Delkar Says “my father committed suicide step because of Praful Patel
Mohan Delkar Suicide:“...म्हणून माझ्या वडिलांनी मुंबईत आत्महत्या केली; प्रफुल पटेल यांच्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं” By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 1:42 PM1 / 10अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांची भेट घेतली आहे 2 / 10मोहन डेलकरांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना न्याय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे अशी माहिती अभिनव डेलकर यांनी दिली. याबाबत पत्रकारांशी अभिनव डेलकर यांनी संवाद साधला, अभिनव म्हणाले की, प्रफुल खेडाभाई पटेल यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केलीय, ते सर्वात मोठे आरोपी आहेत. 3 / 10पोलीस तपासात मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणारे अनेक नावं समोर येतील, गेल्या दीड वर्षापासून माझ्या वडिलांना त्रास दिला जात होता, त्यांचा मानसिक छळ केला जात होता, त्यानंतर वडिलांनी आत्महत्येचे पाऊल उचललं. प्रफुल पटेल हे भाजपाचे(BJP Praful Patel) माजी आमदार होते, मंत्री होते, माझे वडील अपक्ष कसे निवडून येतात याचा त्यांना राग होता, त्यामुळे माझ्या वडिलांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेले असा आरोप त्यांनी केला. 4 / 10तसेच गेल्या ३५ वर्षात वडिलांवर, कुटुंबावर कोणताही गुन्हा नोंद नाही, वडिलांचे नाव खराब होऊन त्यांना जेलमध्ये टाकावं हे यांचे कारस्थान होते, त्यामुळे ते नैराश्येत होते, जी लढाई माझे वडील लढत होते ती जनतेची लढाई होती, लोकांसाठी ते नेहमी झगडत होते, लोकांचे अनेक विषय संसदेत मांडले होते, संसदेत प्रश्न मांडत असल्याने ते लोकांमध्ये अतिशय प्रिय झाले होते, 5 / 10स्थानिक लोकांवर अनेक अत्याचार झाले, त्याला वाचा फोडली होती, घरावर हल्ला करणे, बदनाम करणे हे लोकं करत होते, त्यामुळे या लोकांनीच वडिलांना अशाप्रकारे पाऊल उचलण्यासाठी भाग पडलं असा आरोपही अभिनव डेलकर यांनी केला. दरम्यान, मी लोकांची काम करत राहेन तेवढं जनतेला त्रास होईल असं वडिलांना वाटलं, 6 / 10माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात जाऊन आत्महत्या केली, कारण तेथील सरकारवर विश्वास नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर त्यांचा विश्वास होता, मुंबईत आत्महत्या केल्यास निष्पक्ष चौकशी होईल असं वडिलांनी लिहिलं होतं, भाजपाशासित राज्यात सत्य समोर आलं नसतं म्हणून त्यांनी मुंबईत आत्महत्या केली,7 / 10मीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, शरद पवार-अजित पवारांची भेट घेतली, आमचा ठाकरे सरकारवर पूर्ण विश्वास आहे, डेलकरांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना न्याय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे, सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. नेमकं या आत्महत्येचं कारण काय हे समोर यायला हवं अशी मागणही मोहन डेलकर यांच्या मुलाने अभिनव डेलकर यांनी केली. 8 / 10दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यासह पोलीस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी हे प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या नेते यांच्यावर कट रचून डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळण्याच्या हेतूने दबाव आणणे यासह ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. 9 / 10मरीन ड्राइव्ह येथील ग्रीन साउथ हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी डेलकर यांनी आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये पटेल यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे डेलकर यांनी नमूद केले होते. लेटर हेडवर लिहिलेल्या १६ पानी सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. 10 / 10मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून राज्याच्या विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं, मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जे भाजपा नेते जबाबदार आहेत, त्यांच्यावर आधी कारवाई करावी असा टोला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना लगावला होता. भाजपा नेत्यामुळेच ही आत्महत्या झाल्याचं ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications