Mom and 'he' cut Daddy's neck; kid gave clue to open murder mistry pda
आई आणि 'त्या'ने पप्पांचा गळा आवळला; चिमुरड्याने केली पोलखोल By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 3:09 PM1 / 6विवाहबाह्य संबंधातून प्रेमात बुडलेल्या एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पतीला खुर्चीवर बांधून तिचा गळा दाबला आणि मृतदेह पोत्यात भरुन नाल्यात फेकला. दोन निष्पाप डोळे ही घटना उघड्या डोळ्यांनी पहात होते आणि त्यामुळेच हा हत्याकांड उघडकीस आला. 2 / 6चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या हत्येची संपूर्ण घटनाक्रम आजमगड दीदारगंज पोलिस ठाण्यातील पोलिसांना सांगितला. त्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली.3 / 6या घटनेत पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीचा खून केला आणि एका मृतदेह पोत्यात भरून रात्रीच्या अंधारात फेकून दिला. 4 / 6एका आठवड्यानंतर, लोकांना मृतदेहाच्याच्या दुर्गंधीबद्दल पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. ओळख पटल्यानंतर संपूर्ण घटनेत प्रेमसंबंधाचे प्रकरण समोर आले.5 / 6बायकोला तिच्या विवाहबाह्य संबंधाबाबत विचारले तेव्हा ती बिथरली आणि अस्वस्थ झाली. त्यातून हे हत्याकांड घडलं. मात्र, तिच्या निरागस मुलापासून सत्य लपू शकले नाही. त्याने पोलिसांसमोर संपूर्ण घटना सांगितली की, वडिलांना प्रथम खुर्चीवर दोरीने कसे बांधले गेले व त्यानंतर कशी हत्या करण्यात आली.6 / 6ही संपूर्ण घटना समजल्यानंतर पोलिसांना पत्नीविषयी विचारणा केली असता ती बेशुद्ध होऊन खाली पडली आणि तिने गुन्हा कबूल केला. या घटनेत सामील झालेल्या पत्नीच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications