बापरे! आईनं चिकन शिजवण्यासाठी ठेवलं होतं पाणी, पण १० मिनिटांत त्यात दिसली मुलगी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:46 IST
1 / 6पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईचे नाव डॅरिना तर वडिलांचं नाव इवान आहे. मुलगी लेस्याच्या मृत्यूनंतर पोलीस या दोघांचीही चौकशी करत आहेत.2 / 6ही घटना यूक्रेनच्या ग्रायगोरीवका (Grygorivka) गावात घडली आहे. पोलीस चौकशीत मुलीच्या आईने सांगितले की, चिकन शिजवण्यासाठी त्यांनी किचनमध्ये गॅसवर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. 3 / 6 नंतर काहीतरी कामासाठी ती किचनच्या बाहेर आली. दहा मिनिटांनंतर ती जेव्हा किचनमध्ये पुन्हा गेली तेव्हातिची मुलगी लेस्या उकळत्या पाण्यात पडली होती आणि पोळून निघाली होती.4 / 6पोलीस तपासात असं समोर आलं की, या घटनेनंतर आई-वडिलांनी या मुलीला रुग्णालयात नेलं नाही तर एका साध्या डॉक्टरकडे घेऊन गेले.5 / 6मात्र, प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लेस्या तब्बल दहा दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती, मात्र डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. 6 / 6कोर्टात सुनावणीदरम्यान या मुलीचे आई वडील दोषी गुन्हेगार असल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना ७ ते १५ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.