Mukesh Ambani Bomb Scare: Mystery in Sachin Vaze case; The NIA file chargesheet revealed the motive
Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात गुढ आणखी वाढलं; NIA च्या आरोपपत्रातून हेतू उघड झाला, पण.... By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:43 PM1 / 10मुंबई अँटेलिया प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात NIA ने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे काय हेतू होता? याचा खुलासा केला आहे. परंतु या स्कोर्पिओ गाडीत ठेवण्यासाठी आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे. 2 / 10आरोपपत्रानुसार, अनेक वर्षापासून सचिन वाझे हा पोलीस दलाच्या बाहेर होता. त्यामुळे आपलं जुनं वर्चस्व आणि प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या हेतूने सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा प्लॅन रचला. 3 / 10सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस सेवेत घेऊन त्याला गुन्हे शाखेचे प्रमुख पद देण्यात आले. त्याचसोबत सचिन वाझेला अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखेच्या कार्यालयात एक चेंबरही देण्यात आलं होतं. मुंबई गुन्हे शाखा ही चौथ्या मजल्यावर होती. 4 / 10NIA च्या तपासात आढळलं की, अनेक काळ जेलमध्ये राहिल्यानंतर पोलीस सेवेतून निलंबित झाल्यानं सचिन वाझे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून पुन्हा एकदा स्वत:चं वर्चस्व आणि दबदबा कायम असल्याचं दाखवायचं होतं. गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची होती. 5 / 10सचिन वाझेने त्याच्या अन्य सहकाऱ्यांसोबत मिळून अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली. ज्यात धमकी असलेले पत्रही टाकलं होतं. अंबानी कुटुंबाला मृत्यूचं भय दाखवण्यासाठी ही स्कोर्पिओ गाडी ठेवण्यात आली. तिला दहशतवादी कृत्य असल्याचं चित्र रंगवण्यात आलं. 6 / 10परंतु आरोपपत्रातून सचिन वाझेकडे जिलेटिन कसं आले? याचा खुलासा स्पष्ट झालं नाही. स्फोटक असलेल्या गाडीत २० जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. या कृत्यातून तो मोठ्या व्यापारांकडून पैसे उकळण्याची शक्यता होती. 7 / 10षडयंत्र उघड होईल या भीतीनेच सचिन वाझे आणि त्याच्या साथीदारांनी मनसुख हिरेन यांची हत्या केली. या पूर्ण आरोपपत्रात सचिन वाझेने ज्या स्कोर्पिओ गाडीत २० जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या त्या नेमक्या कुठून आणल्या? याचा उल्लेख करण्यात आला नाही. 8 / 10NIA ने या प्रकरणी ३१२ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहेत. ज्यात ३०३ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सचिन वाझेने हे षडयंत्र रचण्यासाठी १०० दिवस हॉटेल ओबेरॉयमध्ये एक रुम बुक केली होती. ही रुम सुशांत खेमकर नावाचं बनावट आयडीने बुक करण्यात आली होती. सचिन वाझे सेफ हाऊस म्हणून त्याचा वापर करत होता. 9 / 10इतकचं नाही तर सचिन वाझेनेच मनसुख हिरेन यांच्या स्कोर्पिओची नंबर प्लेट बदलली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावावर एका रेंज रोवर कार रजिस्ट्रेशन नंबरचा वापर स्कोर्पिओला करण्यामागे आयडीया सचिन वाझेची होती. जेणेकरुन प्रसिद्ध व्यावसायिकाला घाबरुन त्याच्याकडून वसुली करता यावी. 10 / 10मनसुखला कार चोरीची तक्रार देण्यास सांगून स्वतः ताब्यात घेतली. त्यामध्ये २० जिलेटिनच्या कांड्या, धमकीचे पत्र ठेवून अँटेलियाच्या परिसरात स्कॉर्पियो ठेवली होती, असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications