शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: २५ फेब्रुवारीचा किस्सा! जेव्हा DIG समोर सॅल्यूट न मारता सचिन वाझे सँडविच खात उभा होता, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 9:32 AM

1 / 11
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मते, सचिन वाझे इतका लबाड अधिकारी होता, त्यामुळे गाडी चोरीचा FIR दाखल करण्यापूर्वी मनसुख हिरेन यांना त्यांच्या गाडीत एक आठवड्यानंतर जिलेटिन ठेवणार आहेत याची हिंट दिली असेल असं वाटत नाही
2 / 11
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन ठेवल्यानंतर ४८ तासाच्या आत काही तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांच्याभोवती संशय निर्माण झाला. ही गोष्ट सचिन वाझेला समजली, तेव्हा सचिन वाझेने स्वत:ला वाचवण्यासाठी मनसुख हिरेन यांच्यावर गुन्हा स्वीकारण्यासाठी दबाव टाकला.
3 / 11
सचिन वाझेच्या दबावाला मनसुख हिरेन बळी पडले नाहीत, त्यांनी वाझेंना स्पष्टपणे नकार दिला. कारण त्यांना यामध्ये काहीच माहिती नव्हते, ते निर्दोष होते, त्यामुळे ४ मार्च रोजी सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केली.
4 / 11
या हत्याकांडात नवीन खुलासा होत आहे की, ४ मार्च रोजी सचिन वाझे मुंबई पोलीस मुख्यालयात त्यांचा मोबाईल ठेऊन चालत सीएसटीला गेले होते, संध्याकाळी ७.०१ वाजता ते सीएसटीच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कैद झाले. NIA कडून अद्याप सचिन वाझे सीएसटीला का गेले होते याचा तपास सुरु आहे.
5 / 11
सचिन वाझेला सीएसटीला जायचे असते तर त्यांनी टॅक्सी पकडली असती, दुसरी शक्यता अशी की सचिन वाझेने मुंबई ते ठाणे लोकल प्रवास केला. मुंबईत वाहतुक कोडींत अडकण्याऐवजी त्यांनी ट्रेनने जाणं पसंत केले. कारण मनसुख हिरेन यांची हत्या करण्याची वेळ फिक्स करण्यात आली होती.
6 / 11
मनसुख हिरेन यांना रात्री ८ च्या दरम्यान कॉल आला होता, यावेळी वाहतूक कोंडीमुळे रस्तेमार्गाने ठाण्यात पोहचायला वेळ लागतो, तपास यंत्रणांकडून सचिन वाझेभोवती संशयाची सुई फिरत असताना वाझेला अटक का केली नाही? सचिन वाझे स्वत:ला वन मॅन आर्मी समजत होते असं काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
7 / 11
एका अधिकाऱ्याने २५ फेब्रुवारीचा किस्सा ऐकवला, जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली तेव्हा डीआयजी दर्जाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत स्कोर्पिओ घटनास्थळावरून हटवण्यात आली होती, सचिन वाझे त्याठिकाणी उपस्थित होता.
8 / 11
सचिन वाझे एपीआय होता, प्रोटोकॉलनुसार डीआयजी समोर येताच सचिन वाझेने सॅल्यूट करणं बंधनकारक होतं, परंतु सचिन वाझे डीआयजी अधिकाऱ्यासमोरच सँडविच खात उभे होते, जेव्हा डीआयजीने स्कोर्पिओ कुठे आहे विचारलं तेव्हा वाझेने मला माहिती नाही अस उत्तर दिलं.
9 / 11
त्यानंतर डीआयजीने अतिरिक्त डीजींना फोन लावला, तेव्हा स्कोर्पिओ येलोगेट पोलीस कपाऊंडमध्ये उभी असल्याचं कळालं, या प्रकारावरून सचिन वाझे एपीआय असतानाही डीआयजीला किती महत्त्व देत होता हे दिसून येतं, कारण त्याच्यामागे कोणत्या मोठ्या आयपीएस किंवा बड्या राजकीय नेत्याचा हात असण्याची शक्यता आहे. असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.
10 / 11
एका अधिकाऱ्याने सांगितलं, कोणत्या पोलीस स्टेशन अथवा क्राईम ब्रांचकडून किक्रेट बुकीवर छापा टाकायचा असेल तर डीसीपी अथवा अतिरिक्त सीपी यांची परवानगी लागते, परंतु काही दिवसांपासून कुठेही छापेमारी करायची असेल तर सचिन वाझेशी बोला, असं तोंडी आदेश होता. त्यामुळेच राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप झाला असावा.
11 / 11
जर हे आरोप खोटे आहेत, असंही मानलं तरी सचिन वाझे याच्याकडे ८ महागड्या गाड्या सापडल्या, त्या गाड्या कोणाच्या कमाईने खरेदी केल्या आणि एपीआयच्या पगारात घेणं संभव आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. NIA च्या तपासात अनेक धक्कादायक पुरावे सापडत आहेत, त्यामुळे सचिन वाझे किती लबाड अधिकारी होता हे उघड होत आहे.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीPoliceपोलिसMansukh Hirenमनसुख हिरण