शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक क्लिक अन् मुंबईच्या व्यक्तीनं गमावले ३८ लाख रुपये; नव्या स्कॅमनं वाढवली सायबर पोलिसांचीही चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 5:53 PM

1 / 8
ऑनलाइन स्कॅमच्या घटनांमध्ये आता वेगानं वाढ होत आहे. आता तर असं एकही ऑनलाइन प्लॅटफॉर्म शिल्लक राहिलेलं नाही की जिथं डिजिटल स्कॅम घडलेला नाही. वारंवार आवाहन आणि प्रबोधन करुनही लोक डिजिटल स्कॅमसारख्या घटनांना बळी पडत आहेत. आता असच एक नवं ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे की ज्यानं पोलिसांचीही चिंता वाढली आहे.
2 / 8
मुंबईतील एका ४० वर्षीय व्यक्तीनं सायबर फ्रॉडमध्ये तब्बल ३८ लाख रुपये गमावले आहेत. मुंबईतील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला टेलिग्रामवर एका अनोळखी महिलेचा मेसेज आला होता. संबंधित महिलेनं ऑनलाइन पैसे कमावण्याची ऑफर दिली होती.
3 / 8
काही प्रोडक्ट्सला केवळ ऑनलाइन रेटिंग द्यायची आहे आणि यासाठी चांगलं कमीशन मिळवून देण्याची ऑफर महिलेनं दिली. सोपं काम आणि पैसे कमावण्याची संधी लक्षात घेऊन व्यक्ती जाळ्यात फसला
4 / 8
टेलिग्रामवर महिलेनं पाठवलेल्या ऑफरनंतर आणखी एका महिलेनं या व्यक्तीला काही वैयक्तिक माहितीची पूर्तता करण्यासाठी फोन केला. यात महिलेनं एका वेबसाइटची लिंक पाठवली आणि त्यात लॉगइन करण्यास सांगितलं.
5 / 8
काम पूर्ण झालं की चांगली कमाई करता येईल असा विश्वास महिलेनं व्यक्तीला दिला होता. ही कमाई संबंधित वेबसाइटच्या ई-वॉलेटमध्ये जमा होईल असं सांगण्यात आलं होतं.
6 / 8
पोलीस तक्रारीत नमूद माहितीनुसार या ४० वर्षीय व्यक्तीला एक टास्क पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉपर्टीवर फाइव्ह स्टार रेटिंग देण्यास सांगण्यात आलं होतं. टास्क पूर्ण झाल्यानंतर काही प्रीमियम चार्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या कामाचे पैसे ई-वॉलेटमध्ये जमा होतील असं सांगण्यात आलं होतं.
7 / 8
पीडित व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार टास्क पूर्ण करण्यासाठी व्यक्तीनं तब्बल ३७.८० लाख रुपये खर्च केले. वेबसाइटवर त्याच्या ई-वॉलेटमध्ये ४१.५० लाख रुपये जमा असल्याचं दाखवत होते.
8 / 8
मग त्यानं विड्रॉवल रिक्वेस्ट वेबसाइटवर दिली. पण त्याची रिक्वेस्ट पेंडिगमध्ये असल्याचं दाखवत होतं. काही वेळानंतर पाहिलं तर वेबसाइट आणि टेलिग्राम ग्रूप डिलीट करण्यात आला होता. हे लक्षात आल्यानंतर व्यक्तीला त्याच्यासोबत फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानं पोलीस ठाणे गाठलं.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी