शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: सचिन वाझेचा पोलीस दलातील गॉडफादर कोण?; हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 10:52 AM

1 / 10
सचिन वाझे प्रकरणानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला.
2 / 10
राज्याच्या गृहमंत्र्यांवर अशाप्रकारे धक्कादायक आरोप झाल्यावर विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात रान उठवलं. परमबीर सिंग यांच्यानंतर सरकारने हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी दिली होती. सचिन वाझे प्रकरणात हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला अहवाल पाठवला आहे.
3 / 10
या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्तांचा विरोध असतानाही सचिन वाझेची पोलीस खात्यात नियुक्ती करण्यात आली. परमबीर सिंग यांनीच वाझेला पोलीस दलात पुन्हा घेतल होतं.
4 / 10
सचिन वाझे एपीआय असतानाही थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचा. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरूनच सचिन वाझेकडे हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास सोपवला जात होता असं हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला दिलेल्या अहवालात खुलासा करण्यात आला आहे.
5 / 10
इतकचं नव्हे तर सचिन वाझेच्या टीममधल्या व्यक्तींनाही वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई होती. मंत्र्यांच्या ब्रिफींगवेळी परमबीर सिंग यांच्यासोबत सचिन वाझेही हजर राहायचे. त्याचसोबत सरकारी गाडी असतानाही सचिन वाझे खासगी महागड्या गाड्यातून कार्यालयात येत होते.
6 / 10
निलंबित पोलीस अधिकाऱ्याला सेवेत घेतल्यानंतर महत्त्वाचं पद न देण्याचे संकेत असतानाही सचिन वाझेला सीआययूच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली. याला पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. सीआययूचे रिपोर्टिंग मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे होतं.
7 / 10
दरम्यान, सचिन वाझेप्रकरणात परमबीर सिंग हे NIA कार्यालयात गेले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांचा तपासासाठी परमबीर सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
8 / 10
याचसोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक चौकशीत आरोप करणाऱ्या माजी आयुक्त परमबीर सिंग यांचा सविस्तर जबाब नोंदविला जाईल.
9 / 10
त्याचबरोबर त्यांच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये नमूद असलेल्या डीसीपी भुजबळ व एसीपी पाटील यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे गंभीर गुन्ह्याप्रकरणी एनआयएच्या कोठडीत आहे, त्यामुळे सुरुवातीला अन्य साक्षीदारांकडे चौकशी केल्यानंतरच त्याच्याकडे मोर्चा वळविला जाणार असल्याचे समजते.
10 / 10
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली. त्या पत्राच्या आधारे सीबीआय चौकशी करण्याबाबत ॲड. जयश्री पाटील यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य करून त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेHemant Nagraleहेमंत नगराळेMumbai policeमुंबई पोलीसMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी