शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sukma Naxal Attack: घनदाट जंगलात जवानांना आधी शांततेत घुसू दिले, नंतर घात केला; रॉकेट लाँचर, एके ४७...सुकमा हल्ल्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 3:22 PM

1 / 10
रायपूर : छत्तीसगडमध्ये आज झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात (Naxal attack ) 24 जवान शहीद झाले आहेत. कुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान त्याच्या परिसरात गेले होते. 2000 जवानांची मोठी टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्यासाठी जंगलात घुसत होती. मात्र, नक्षलवाद्यांनी या जवानांना कोणत्याही प्रकारे न रोखता आतमध्ये जाऊ दिले आणि घात केला. (Chhattisgarh: 24 jawans killed, 31 injured in anti-Naxals operation in Sukma)
2 / 10
सुरक्षा दलाच्या काही टीम तयार करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगलात त्यांना कोपरान कोपरा शोधायचा होता. मात्र, नक्षलवादी त्यांची वाटच पाहत होते. अनेट तुकड्यांपैकी एका तुकडीला नक्षलवाद्यानी तीन बाजुंनी घेरले आणि हिडमाच्या बटालियनने हल्ला केला. यामध्ये हे जवान शहीद झाले.
3 / 10
हिडमाची बटालियन डोंगररांगांतून फायरिंग करत होती. यामुळे खाली असलेले जवान सहज लक्ष्य ठरले. तिन्ही बाजुंनी घेरलेल्या जवानांनी त्या ही परिस्थितीत हिडमाच्या मोक्याच्या जागी लपलेल्या आणि हल्ला करत असलेल्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले.
4 / 10
यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीस सुत्रांनी सांगितले की, घटनास्थळवरून 4 ट्रॅक्टरमध्ये भरून नक्षलवाद्यांनी त्यांच्या साथीदारांचे मृतदेह नेले आहेत. काही दिवसांपूर्वीच हिडमाने पोलिसांना आव्हान दिले होते.
5 / 10
हिडमाच्या य़ा बटालियनमध्ये सर्वाधिक घातकी नक्षलवाद्यांचा भरणा आहे. त्याच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक हत्यारे असलेली जवळपास 800 नक्षलवाद्यांची टीम असते. आज झालेल्या चकमकीच्या ठिकाणी जवळपास 800 हून अधिक नक्षलवादी होते, असे एका प्रत्यक्ष मोहिमेत असलेल्या पोलीसाने सांगितले.
6 / 10
हिडमा हा कधी छत्तीसगढ, कधी आंध्र प्रदेश तर कधी तेलंगानाच्या जंगलात लपत असतो. ही चकमकीची जागादेखील तेलंगानाच्या सीमेला खेटून आहे.
7 / 10
हिडमाच्या नक्षलवाद्यांकडे अनेकप्रकारची अद्ययावत शस्त्रास्त्रे आहेत. जवानांवर हिडमाच्या या नक्षल्यांनी रॉकेट लाँचरद्वारे हल्ला केला. उंचावर असल्याने नक्षलवादी या जवानांना आरामात लक्ष्य बनवत होते.
8 / 10
जखमी जवानांनी सांगितल्यानुसास नक्षलवाद्यांकडे युबीजीएल, रॉकेट लाँचर, इन्साससह एके-47 अशी हत्यारे आहेत. या जवानांनी यु शेपच्या खिंडीत जवानांना घेरले आणि 100 ते 200 मीटरच्या रेंजमधून फायरिंग सुरु केली.
9 / 10
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना करण्यात आली होती. विजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते.
10 / 10
शनिवारी नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमत तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं. यापूर्वी २३ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यात स्फोट करून बस उडवली होती. यात बसमध्ये असलेले डीआरजीचे पाच जवान शहीद झाले होते.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसMartyrशहीद