शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने बजावले समन्स, कोण आहे मुच्छड पानवाला जाणून घ्या?

By पूनम अपराज | Published: January 11, 2021 6:13 PM

1 / 6
NCB कडून मुच्छड पानवालाला समन्स बजावण्यात आलं आहे. मुच्छड पानवालाचे दुकान मुंबईतील साऊथ कॅम्प्स कॉर्नर इथं आहे. जयशंकर तिवारी यांचं हे दुकान आहे.  मुच्छड पानवालाचं नाव मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
2 / 6
मुच्छड पानवाला यांनी मुंबईतील नेपियन्सी रोड, मुंबई सेंटर आणि खेतवाडीमध्ये आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे. 
3 / 6
बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार, अनेक बडे उद्योगपती या मुच्छड पानवालाचे ग्राहक आहेत. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हा सुद्धा याच पानवाल्याकडून नेहमी पान खातो. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी इथून पान जातं. सध्या हे दुकान उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी चालवतात.
4 / 6
मुच्छड पानवालाचे दुकान १९७७ पासून मुंबईत सुरु आहे. या दुकानाची सुरुवात श्यामचरण तिवारी यांनी केली होती. असं म्हणतात या पानात हर्बल प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. या दुकानात २० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंतचं पान विकत मिळतं. मुच्छड पानवालाचे पान मुलांमध्येही प्रसिद्ध आहे. कारण, या दुकानात चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, व्हॅनिला अशा विविध ५० फ्लेव्हर्समध्ये पाने मिळतात. जयशंकर तिवारी यांनी आपल्या वडिलांप्रमाणे मोठ्या मिश्या ठेवत हा कारभार सांभाळला आहे.
5 / 6
मुच्छड पानवाला यांच्याकडे कलकत्ता, बनारसी आणि मघई अशा तीन प्रकारच्या पानाचा समावेश आहे. पानात वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या चटणीचा वापर केला जातो. या दुकानात अनेक प्रकारचे पाने खवय्यांना मिळतात. गोड पानाच्या प्रकारात कोलकाता स्वीट, गुंडी स्वीट, मगई स्वीट, चॉकलेट स्वीट, स्पेशल स्वीट, पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी स्वीट पानांचा समावेश आहे.
6 / 6
एक ब्रिटीश नागरिक करण सजनानीने चालवलेल्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने तिवारी यांच्या दुकानाचं नाव घेतल्याने एनसीबीने त्यांना समन्स पाठवून सोमवारी बोलावले आहे. करण सजनानी या ब्रिटिश नागरिक आणि अन्य दोन महिलांना अटक केली होती. अटक केलेल्या महिलांपैकी एकाची ओळख रहिला फर्निचरवाला असे आहे, जी यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीसाठी मॅनेजर म्हणून काम करीत होती.
टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थMumbaiमुंबई