New bride threat to husband for money after marriage in MP
दे धक्का! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने पतीला मागितले २० लाख रूपये, कॉल करून म्हणाली - '...तर तुझा जीव घेईन!' By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 2:03 PM1 / 9मध्य प्रदेशच्या ग्वालिअर जिल्ह्यामध्ये लग्नानंतर पतीला पैशांसाठी ब्लॅकमेक करत असलेल्या एका पत्नीचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांआधी या व्यक्तीचं लग्न झालं होतं. या व्यक्तीने आरोप लावला आहे की, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पत्नी २० लाख रूपये मागत आहे. जेव्हा त्याने घटस्फोटासाठी अर्ज केला तर महिलेने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.2 / 9पीडित पतीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याने घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली. यावर पत्नी व्हिडीओ कॉल करून म्हणाली की, याचिका मागे घे, नाही तर जीव घेईन. ही घटना इंदरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील नौगजा रोड येथील आहे. 3 / 9ही व्यक्ती धमक्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता, पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली. 4 / 9इथे राहणाऱ्या विकासने काही दिवसांपूर्वी पत्नी नम्रता कुमारीसोबतचं लग्न तोडण्यासाठीची याचिका कोर्टात दाखल केली आहे. ज्यानंतर त्याला धमक्या मिळत आहेत. तो बुधवारी घरी काम करत होता, तेव्हा त्याला महिलेने व्हिडीओ कॉल करून धमकी दिली. 5 / 9जवळपास तीन महिन्यांआधी त्याने लग्नासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केलं होतं. ज्यानंतर चार दिवसांनीच झारखंडच्या नम्रता कुमारीने त्याला संपर्क केला होता. ज्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. त्यानंतर ३ फेब्रुवारीला नम्रता आणि विकासने भोपाळमधील आर्य समाज मंदिरात लग्न केलं. 6 / 9पीडित विकासने सांगितले की, ३ फेब्रुवारीला लग्न केल्यानंतर ४ फेब्रुवारीला नम्रताने त्याला सांगितले की, ती घरी जात आहे. ज्यानंतर त्याला फोन आला आणि नम्रताने त्याला तिच्या घरी बोलवलं. 7 / 9तो जेव्हा रांची रेल्वे स्टेशनवर पोहोचला तेव्हा न्रमता आपल्या १० ते १५ साथीदारांसोबत त्याला बांधून घेऊन गेली. यादरम्यान त्याला धमकी दिली की, जर इथून सुखरूप जायचं असेल तर ५ लाख रूपये मागव.8 / 9विकासने सांगितलं की, तिच्यासोबत असलेल्या लोकांपैकी एकजण नम्रताचा पती असल्याचं सांगितलं गेलं. बाकी तिचे साथीदार होते. विकास त्यावेळी बाथरूमचं कारण देत तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तेच तिला घटस्फोटाची नोटीस गेली तर त्याला धमक्या देत आहे. नम्रताने धमकी दिली की, २० लाख रूपये दे नाही तर रेपची खोटी केस करेन.9 / 9पोलीस अधिकारी शैलेंद्र भार्गव यांनी सांगितले की, एका तरूणाच्या तक्रारीवरून त्याच्या पत्नीविरोधात धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications