New revelation in Noida Manisha murder case woman killed by brother along with wife and her lover
खळबळजनक! वहिनीचं अफेअर, ४ कोटींची संपत्ती अन् सुटकेसमध्ये जाळला नणंदेचा मृतदेह By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 8:14 PM1 / 10उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील सदरपूर येथे राहणारी मिनी करवा चौथच्या दिवशी बेपत्ता झाली होती. तिच्या चुलत भावाने याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. ती ऑफीसला पोहचली नाही म्हणून मिनीच्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. मैत्रिणीने मिनीच्या वहिनीला फोन केला तेव्हा तिने सांगितले की आम्हीही तिचा शोध घेत आहोत पण त्यानंतर मिनीचा मृतदेह बागपतमध्ये सापडला.2 / 10बागपतमधील सिसाना गावातील स्मशानभूमीजवळ गुरुवारी सकाळी एका सुटकेसमध्ये अज्ञात मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकीदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 3 / 10एकीकडे तिची ओळख पटवणे कठीण झाले होते तर दुसरीकडे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस या हत्येचा प्रेमप्रकरणाच्या अँगलमधून तपास करत होते. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्यांना महत्त्वाचा सुगावा लागला. मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जाळणारे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला.4 / 10पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिलेली कार हरियाणातील सोनीपत येथील असल्याचे समजते. पोलिसांनी सोनीपत येथून एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान या व्यक्तीने सांगितले की, गुडगावमध्ये काम करणाऱ्या बागपतचा रहिवासी पवनने काही तासांसाठी एका महत्त्वाच्या कामासाठी त्याची कार भाड्याने घेतली होती. चौकशीदरम्यान हेही समोर आले की, पवनचे नोएडा येथील एका महिलेशी प्रेमसंबंध होते, जिचे माहेरचे घर सोनीपत गावात आहे. अथक परिश्रमानंतर अखेर तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.5 / 10पोलिस तपासात एका मागोमाग एक पुराव्यांची लिंक जोडत जात होती. नोएडा पोलिसांनी चौकशी केली असता, मनिषा (मिनी) नावाची मुलगी करवा चौथच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे आढळून आले, तिच्या चुलत भावाने हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मनिषाच्या घरी जाऊन तपास केला असता, ताब्यात घेतलेली व्यक्ती ज्या महिलेबद्दल बोलत होती ती मनिषाची वहिनी असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती पोलिसांची दिशाभूल करत होती. त्यानंतर खाकीचा धाक दाखवताच तिनं खुनाचे गूढ उकललं.6 / 10पती मनीष आणि प्रियकर पवनसोबत मिळून मनिषाची हत्या केल्याची कबुली महिलेने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. पोलिसांसमोर घटनेची कबुली देताना आरोपी महिला आणि तिच्या पतीने सांगितले की, मनिषाने वहिनी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून व्हिडिओ बनवला होता. तिला अनेक वेळा व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले पण ती मान्य करत नव्हती. यावरून बराच वाद झाला. ज्याची नोंद नोएडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यानंतर महिलेने तिचा प्रियकर पवनसोबत हत्येचा कट रचला गेला, त्यात संपत्तीचाही हवाला दिला जेणेकरून पतीलाही त्यात सामील करून घेता येईल.7 / 10मनिषाच्या वडिलांचा कोरोनादरम्यान मृत्यू झाला. मनिषा आणि तिचा भाऊ मनीष उर्फ विवेक चौहान यांच्याकडे सुमारे ४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. कागदपत्रांवर दोघांच्या सह्या असतील तरच ती मालमत्ता विकता येईल. मनीषने वारंवार विनंती करूनही मनिषाने मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नाही आणि मालमत्ता विकण्यास विरोध केला. या लालसेपोटी भाऊ मनीषने पत्नीने विणलेल्या जाळ्यात अडकून बहिणीचा स्वतःच्या हाताने गळा आवळून खून केला. 8 / 10पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वहिनी शिखाचा प्रियकर पवन हा मनिषाच्या घरी सारखा यायचा. जो शिखाचा मावस भाऊ म्हणून जवळपास १५ दिवस मनिषाच्या घरी राहिला होता. मनिषाच्या हत्येचा कट रचल्यानंतर पवनने सोनीपत जिल्ह्यातील भैरा बांकीपूर गावातील एका नातेवाईकाची गाडी तासाभरासाठी मागितली. तासाभरानंतरही पवन गाडी घेऊन आला नाही आणि पवनने फोन बंद केला. नंतर २ नोव्हेंबरला सकाळी पवनने कार परत केली. 9 / 10सिसाणा गावातील आरोपी पवन हा फरार होता. मंगळवारी सायंकाळी सिसाणा गावातील स्मशानभूमीजवळ पोलिसांची फरार मारेकरी पवनसोबत चकमक झाली, त्यात पवनच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी पवनला अटक केली. 10 / 10त्यानंतर त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या ठिकाणी मृतदेह जाळण्यात आला त्याच ठिकाणी चकमकही झाली असल्याचे सांगितले. मात्र, मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पवन काय करत होता असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications