शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवविवाहितेने धरले पतीचे दोन्ही हात अन् प्रियकराने कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 3:05 PM

1 / 8
मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील हत्येची घटना येथील पोलीस अधीक्षकांनी स्वत: लेटेरी येथे जाऊन उघडकीस आणली. पत्नी कृष्णाबाई ही पतीचा मारेकरी असल्याचे समोर आले, तिने आपला प्रियकर शुभम यांच्यासोबत मिळून पतीचा खून केला. यादरम्यान कृष्णाबाईने आपल्या पतीचा हात धरला आणि प्रियकराने कुऱ्हाडीने त्याला ठार केले.
2 / 8
विदिशाचे पोलिस अधीक्षक विनायक वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदिशाच्या लटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात मंगळवारी रात्री पतीची हत्या करण्यात आली. मात्र, या घटनेवेळी पत्नी कृष्णाबाई हिने बेशुद्ध झाल्याचे सांगितले. परंतु पोलिसांचा पहिल्या दिवसापासून तिच्यावर संशय होता आणि आता पोलिसांनी याचा खुलासा केला आहे.
3 / 8
दरम्यान, पत्नी कृष्णाबाई ही एक दिवस आधीच सासरच्या घरी आली होती. तिने 4 वर्षांच्या प्रेमसंबंधामुळे प्रियकरासह आपल्या स्वत: च्या पतीचीही हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
4 / 8
कृष्णाबाई हिने आपल्या प्रियकराला फोनवरून बोलावून घेतले होते. त्यानंतर शुभम त्याच्या मोटारसायकलमध्ये बाराशे रुपयांचे पेट्रोल टाकून आणि कुऱ्हाड बांधून तिच्या पतीला ठार मारण्यासाठी गावात आला होता.
5 / 8
विषेश म्हणजे, प्रियकर शुभम हा गुगलवर सर्च करत गावात पोहोचला होता. यावेळी कृष्णाबाई घराबाहेर त्याची वाट पाहत होती. शुभम आल्यानंतर या दोघांनी मिळून ही घटना घडवून आणली.
6 / 8
लग्नाच्या 15 दिवसानंतर कृष्णाबाई या महिलेने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. पत्नीने पतीचे दोन्ही हात धरले आणि प्रियकर शुभमने त्याची कुऱ्हाडीने हत्या केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
7 / 8
विदिशाचे एसपी विनायक वर्मा यांनी सांगितले की, 6 जुलै रोजी सकाळी आनंदपूर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सोनू या 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीने एक दिवस आधी येथे येऊन वाद घातला होता. आम्ही सोनूची पत्नी कृष्णाबाईला कॉल डिटेल्स आणि इतर माहितीच्या आधारे संशयास्पद मानत होतो.
8 / 8
तसेच, तिची ओळख गेली 4 वर्षे अब्दुल्लागंज जिल्हा रायसेन येथील शुभमसोबत होती. त्यामुळे ती सोनूसोबत लग्न तयार नव्हती. 5 आणि 6 जुलै रोजी मध्यरात्री दोघांनी मिळून सोनूची हत्या केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यांत वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे, असे एसपी विनायक वर्मा यांनी सांगितले.