Nikki Yadav murder case sahil gehlot stayed with his wife for 3 days after marriage
निक्की हत्याकांड! नव्या नवरीसोबत 3 दिवस राहिला, पण...; तिच्या माहेरीही सन्नाटा पसरला By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:52 AM1 / 10हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील खेडी खुम्मर गावात राहणाऱ्या निक्की यादवची हत्या केल्यानंतर साहिल गेहलोतने दुसरं लग्न केलं होतं. साहिलने 9 फेब्रुवारीच्या रात्री निक्कीची हत्या केली आणि 10 फेब्रुवारीला गावात येऊन विधीवत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे. 2 / 10निकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा वाढता दबाव पाहून त्याने चौथ्या दिवशी आपल्या हातून एका मुलीची हत्या झाल्याचे पत्नीला सांगितले. आता पोलीस त्याला पकडतील. म्हणूनच तिने तिच्या घरी जावं असंही त्याने सांगितलं. या प्रकरणाची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी तिला घरी आणलं.3 / 10साहिलला पोलिसांनी पकडले. आरोपीची पत्नी राहत असलेल्या गावात सध्या शांतता आहे. साहिल गहलोतने ज्या मुलीशी लग्न केले ती कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे. तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने तिला वाढवलं आहे आणि आता तिचे लग्न झाले होते. 4 / 10हातावरची मेहंदीही गेली नव्हती की मुलीच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेने तिला नातेवाईकांना धक्का बसला आहे. साहिलने मुलीची हत्या केल्याचे मंगळवारीच मुलीच्या नातेवाईकांना समजलं.5 / 10आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निकीचे वडील सुनील यादव यांनी केली आहे. ते म्हणाले की, निक्की आणि श्रद्धा सारखे प्रकरण रोजच एका मुलीसोबत घडत आहेत. 6 / 10हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील खेडी खुमार गावात राहणाऱ्या निक्की यादव नावाच्या मुलीचा तिच्या प्रियकराने कारमध्ये मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला. बुधवारी पोस्टमॉर्टमनंतर निक्की यादवचा मृतदेह तिच्या मूळ गावी पोहोचला. 7 / 10निक्कीचे वडील सुनील म्हणाले की, आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्यांची मुलगी आरोपी साहिलसोबत लिव्ह-इनमध्ये राहत नव्हती, हे पूर्णपणे खोटे आहे, त्यामुळे असं म्हणणं लोकांनी बंद केला पाहिजे असंही सांगितलं. 8 / 10निकीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ही गोष्ट पूर्णपणे नाकारतो आणि हा आमच्या समाजाचा अपमान आहे. जेव्हा एखाद्या मुलीवर असा गुन्हा केला जातो तेव्हा तिची ओळख उघड होत नाही. आता तर गावाची आणि कुटुंबाची ओळखही समोर आली आहे.9 / 10गावातील वकिलाने सांगितले की, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला हे भाग्य आहे, अन्यथा आमच्या मुलीचे श्रद्धासारखे तुकडे केले असते. हत्याकांडानंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, सध्या सुरू असलेले हे ट्रायल थांबवा. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 10निक्की यादव खून प्रकरणानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी मीडियाला ट्रायल थांबवण्याचे आवाहन केल्याने गावाची आणि कुटुंबाची बदनामी होत आहे. कुटुंबीयांनी हिंदू विधीनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ते सरकारकडे करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications