शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रॅप, मर्डर आणि अ‍ॅसिड कांड...! 'कुबूल है' मालिका बघत तरुणीनं रचला स्वतःच्याच हत्येचा कट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 3:01 PM

1 / 9
उत्तर प्रदेशातील नोएडा भागातील बिसरखमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने एक मालिका बघत आत्महत्येचा कट रचला. या अंतर्गत तिने एका दुसऱ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हत्या केलेल्या मुलीचा चेहरा ओळखू येऊ नये यासाठी तेने अॅसिडच्या सहाय्याने तिचा चेहराही जाळला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
2 / 9
संबंधित आरोपी तरुणीने 'कुबूल है' नावाची मालिका पाहून, आपल्या प्रियकराच्या साथीने आत्महत्येची खोटी कहाणी रचली. यानंतर, ही कहाणी सर्वांना खरीच वाटावी, यासाठी तिने तिच्या सारखीच शरीरयष्टी असलेल्या मुलिला ट्रॅप केले आणि तिची हत्या केली. एवढेच नाही, तर या हत्येनंतर मृतदेहाचा चेहरा लक्षात येऊ नये, म्हणून तीने तिचा चेहरा अॅसिडच्या सहाय्याने जाळला होता.
3 / 9
या आरोपी तरुणीने, आपल्याच हत्येची पुष्टी व्हावी, यासाठी एक सुसाईड नोटही तयार केली होती. यानंतर संबंधित तरुणीच्या भावाने आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचे समजून तिच्यावर अंत्य संस्कारही केले. मात्र तो मृतदेह त्यांच्या बहिणीचा नव्हताच तर दुसऱ्याच कुण्या मुलीचा होता. जाणून घ्या नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण...?
4 / 9
हे संपूर्ण प्रकरण सुरू होते, 12 नोव्हेंबरला. 12 नोव्हेंबरला दादरी पोलिसांना एका मुलीने आत्महत्या केल्याची सूचना मिळते. मुलीचे वय 21 वर्ष होते. या मुलीचा चेहरा जळालेला होता. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. यात, माझा चेहरा जळाला आहे, आता अशा चेहऱ्यासोबत माझी जगण्याची इच्छा नाही, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले होते.
5 / 9
संबंधित मृत तरुणीचे नाव पायल असल्याचे सांगण्यात आले होते. तिला दोन भाऊ आहेत. तिच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. यानंतर संबंधित तरुणीचे भाऊ बहीण समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मात्र, नंतर जे काही उघड झाले, ते धक्कादायक आणि थरकाप उडवणारे होते. कारण तो मृतदेह पायलचा नव्हता, तर हेमलताचा होता.
6 / 9
हेमलताच्या भावाने आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी हेमलताचा नंबर ट्रेस केला, तेव्हा त्यांना कुण्या अजय नावाच्या तरुणाचा नंबर मिळाला. तो अजय पायलचा प्रियकर निघाला. यानंतर त्याची चौकशी केली असता, त्यानं संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आणि ही धक्कादायक घटना उघड आली.
7 / 9
काय होतं संपूर्ण प्रकरण? का करण्यात आली हेमलताची हत्या? - पोलिस चौकशीत पायलने सांगितले, तिच्या आई-वडिलांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यासाठी ती आपल्या भावाच्या सासरच्या लोकांना जबाबदार मानत होती. तिला त्यांना मारायचे होते. पायल स्वतःला मृत सिद्ध करून त्यांची हत्या करणार होती. जेणेकरून तिच्यावर कुणालाही संशय येऊ नये.
8 / 9
पायलने 'कुबूल है' मालिकेतून आयडीया घेत हा संपूर्ण कट रचला. यासाठी तिने अपल्या सारख्याच दिसणाऱ्या हेमलताला बढपुरा येथील आपल्या घरी बोलावले. यानंतर प्रियकराच्या साथीने तिची हत्या केली. हेमलताच्या हत्येनंतर, पायल भावाच्या सासरच्या लोकांची हत्या करण्याच्या प्रयत्नात होती.
9 / 9
लग्नाचा अँगलही आला समोर - तत्पूर्वी, पायलला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते, म्हणून तिने स्वतःच्याच हत्येचा कट रचला, असे समोर आले होते. पायलचे आजोबा ब्रह्म सिंह यांनी म्हटले आहे की, पायल भाटीच्या लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, तिला अजयसोबतच लग्न करायचे होते. मात्र, घरातील लोक हे लग्न होऊ देणार नाहीत, अशी भीती तिला होती. या भीतीपोटी तिने हा कट रचला, जेणेकरून लोक तिला मृत समजतील आणि ती अजयसोबत सहजपणे राहू शकेल.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट