शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंद कॅमेऱ्याआड नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; गुप्तांगाला स्पर्श करत केली सहनशक्ती टेस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:36 PM

1 / 8
विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपानुसार संस्थानच्या कोषाध्यक्षांनी सहनशक्ती टेस्ट ('testing tolerance') करण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार समोर आला आहे.
2 / 8
ही घटना तिरला येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये घडली आहे.
3 / 8
या प्रकरणात आरोपी कोषाध्यक्ष परवेज आलम उर्फ बबलू याच्याविरोधात खूंटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 / 8
रविवारी पोलिसांनी त्याला अटक करीत तुरुंगात पाठवलं आहे. शनिवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर खूंटी बीडीओ सविता सिंह आणि खूंटी महिला ठाण्याच्या प्रभारी दुलारमनी टुडूने नर्सिंग ट्रेनिंग सेंटर पोहोचून प्रकरणाचा तपास केला.
5 / 8
पीडित विद्यार्थिनींची चौकशी केल्यानंतर बीडीओने सांगितले की, संस्थानच्या कोषाध्यक्षांच्या कृत्यामुळे सेंटरच्या मुली घाबरल्या आहेत. त्यांना आपल्या भवितव्याची चिंता आहे.
6 / 8
विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की, पल्स चेक करण्याच्या बहाण्याने कोषाध्यक्षाने त्यांच्या गुप्तांगाला हात लावला. त्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी त्यांना धमकीही दिली. या प्रकरणात खूंटी जिल्हा प्रशासन गंभीर असून जिल्ह्याचे उपायुक्त शशी शेखर आणि एसपी आशूतोष शेखर यांनी दोषीवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
7 / 8
पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊनचौकशीचे आदेश दिले आहेत. एनजीओच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये सध्या ६० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत.
8 / 8
६० विद्यार्थिनींपैकी ५८ खूंटी जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. तर दोन विद्यार्थिनी गुमला येथे राहणारी आहेत.
टॅग्स :MolestationविनयभंगJharkhandझारखंडPoliceपोलिसStudentविद्यार्थी