OMG! 6-year-old boy commits theft of Rs 67 lakh, training was given by parents
बाबो! ६ वर्षाच्या मुलाने केली तब्ब्ल ६७ लाखांची चोरी, आई - बापाने दिले होते प्रशिक्षण By पूनम अपराज | Published: December 16, 2020 6:44 PM1 / 5चोरीची घटना घडण्यापूर्वीच इली पारा आणि मार्टा पॅरा लक्झरी स्टोअरमध्ये गेले होते आणि त्यांनी त्याचवेळी घड्याळाचा फोटो क्लिक केला होता. पाच दिवसांनंतर, ते दाम्पत्य आपल्या सहा वर्षाच्या मुलासह स्टोअरमध्ये गेले आणि यादरम्यान मुलाने मौल्यवान घड्याळ चोरले.2 / 5खरं तर, दाम्पत्याने आपल्या मुलाला बनावट घड्याळ घेऊन पाठवले होते, जे त्याने चोरीच्या घड्याळाच्या जागेवर ठेवले होते. यामुळे स्टोअरच्या कर्मचार्यांना ही चोरी त्वरित पकडता आली नाही. दुसर्या दिवशी एका कर्मचाऱ्याने घड्याळ बदलताना पाहिले तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली.3 / 5रोमानियाचा रहिवासी असलेले हे जोडपे चोरीच्या घटनेनंतर ब्रिटन सोडून जाण्याच्या प्रयत्नात होते, परंतु फरार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली.4 / 5या जोडप्याने 19 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या लहान मुलाच्या माध्यमातून चोरीची घटना घडवून आणली होती.5 / 5या गुन्ह्यासाठी कोर्टाने मुलाच्या वडिलांना 18 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावली, तर आईला 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications