शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘ऑपरेशन ब्लॅकफेस’! गुगलवर सर्च करताना घ्या खबरदारी अन्यथा होईल थेट तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 11:39 AM

1 / 8
चाईल्ड पॉर्नोग्राफीबाबत सरकारकडून गंभीर दखल घेण्यात येत असून त्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी गुगलवर सर्च करणं हादेखील गुन्हा असल्याचं सायबर पोलिसांचे म्हणणं आहे. त्यामुळे गुगलवर एखादी या निगडीत गोष्ट सर्च करणं थांबवा.
2 / 8
गेल्या वर्षी एनसीआरबीने महाराष्ट्रातील १ हजार ७०० प्रकरणं महाराष्ट्र सायबरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केली आहेत. यात मुंबई शहरातून सुमारे ६०० प्रकरणांचा समावेश आहे. मुंबईतील वाढत्या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या सायबर महाराष्ट्रनं ऑपरेशन ब्लॅकफेस मोहिम हाती घेतली आहे
3 / 8
तज्ज्ञांच्या मदतीने चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित चित्रफिती, मजकूर, छायाचित्रे जाहीर करणाऱ्या व्यक्तींची नेमकी ओळख पटविली. त्या व्यक्तीनेच हे कृत्य केले हे स्पष्ट करणारे भक्कम पुरावेही गोळा केले. माहिती एकत्रित करून त्या जिल्ह्यातील प्रकरणं तेथील पोलिसांकडे कारवाईसाठी सुपूर्द केली.
4 / 8
आता त्या पुराव्याच्या आधारे राज्यात सर्वत्र चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अँन्ड एक्स्पलॉयटेड चिल्ड्रेन ही संस्था चाईल्ड पॉर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. फेसबुकसह अन्य समाजमाध्यमात ती सक्रीय आहे.
5 / 8
संकेतस्थळावर जाहीर होणाऱ्या चाईल्ड पॉर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन या सर्वोच्च तपास यंत्रणेला माहिती पुरवते. भारतात अशा ध्वनिचित्रफिती किंवा अन्य मजकूर समाजमाध्यमावर जाहीर करणाऱ्या व्यक्तीची तांत्रिक माहिती दिली जाते.
6 / 8
ही माहिती पुरवण्याबाबत संस्था आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत करार केला आहे. करारानुसार, या संस्थेने चाईल्ड पॉर्नोग्राफी पसरवणारे आयपी एड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती एनसीआरबीला पुरवली. चाईल्ड पॉर्नोग्राफीबाबत सर्च करणं गुन्हा आहे.
7 / 8
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे नोंद झाल्यावर तपास करताना संबंधित आरोपीने समाजमाध्यमावर प्राप्त झालेल्या चित्रफिती किंवा मजकूर जाहीर केला की प्रत्यक्ष निर्माण केला. या आरोपीचा अश्लील चित्रफिती तयार करणाऱ्या टोळ्यांशी संधान आहे का?
8 / 8
पैसे घेऊन त्याने ही निर्मिती केली आहे का आदी बाबी स्पष्ट होऊ शकतील. गुन्हे नोंदवून किंवा आरोपीवर कारवाई करण्यासोबत प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार घडलेल्या बालकांना शोधून त्यांचे पुनर्वसन करणे हा ऑपरेशन ब्लॅकफेसचा मुख्य उद्देश असल्याचं नमूद केले.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस