In Pakistan, a foreign woman is dragged out of a car and gang-raped in front of her children.
पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 7:45 PM1 / 5या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने घटनेसाठी त्या महिलेला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित महिला फ्रान्सची रहिवासी आहे. त्याचवेळी काही वर्षांपूर्वी कराचीमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. (All Photos - Aaaj Tak)2 / 5बलात्काराची ही घटना लाहोरजवळ घडली आहे. फ्रान्समधील महिला स्वत: गाडी चालवत होती. महामार्गावरून जाताना गाडी थांबली. दुपारी 1.30 वाजता गाडीजवळ 2 जण आले आणि त्यांनी कारची खिडकी फोडली. त्या महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना कारबाहेर खेचले. मुलांसमोर अनेकदा या महिलेवर बलात्कार करण्यात आला. गुन्हेगारांनी महिलेचे दागिने, रोख रक्कम आणि बँक कार्डही लुटले.3 / 5असे सांगितले जाते की, कारमधील पेट्रोल संपल्यानंतर महिलेने पोलिसांना बोलावले आणि मदतीची वाट पहात होती. या प्रकरणात 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत पाकिस्तानात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. असंतोष दर्शवत प्रशासनाच्या विरोधात बरीच निदर्शने करण्यात येत आहेत.4 / 5या प्रकरणातील मुख्य तपासनीस आणि पोलिस अधिकारी ओमर शेख यांनी रात्री एकट्याने प्रवास करण्याआधी त्या महिलेस संपूर्ण माहिती घेतली पाहिजे होती, असे बोलून नागरिकांचा रोष वाढविला आहे. शेख म्हणाले की, पाकिस्तानी समाजातील कोणीही आपल्या बहिणीला आणि मुलीला इतक्या रात्री एकट्याने प्रवास करू देणार नाही. प्रवासादरम्यान त्यांनी सुरक्षित महामार्ग वापरला असता आणि गाडीत पुरेसे इंधन ठेवले पाहिजे होते, असे शेख म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पीडित महिलेने पाकिस्तानी समाज सुरक्षित समजला.5 / 5अधिकाऱ्याच्या या विधानावर नागरिक संतापले आणि म्हणाले की, पीडितेला दोष देण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. पाकिस्तानमध्ये बर्याच वेळा असे झाले आहे की, फक्त तक्रार करणार्या महिलेस गुन्हेगार म्हटले जाते. त्याचबरोबर मानवाधिकार मंत्री शीरीन मझारी म्हणाल्या आहेत की, पोलिस अधिकाऱ्यांची टीका अस्वीकार्य आहे. त्या म्हणाल्या की, बलात्काराची घटना कधीही न्याय्य ठरू शकत नाही. महिला हक्कांसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकारी उमर शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications