शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pooja Chavan : ५७४ किमी अंतर कसे पार केले? त्या प्रवासामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचे गुढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 12:34 PM

1 / 6
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. एकीकडे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण तीव्र होत असतानाच तपास करत असलेल्या पोलिसांना नेमके धागेदोरे सापडत नसल्याने तपास अडखळत आहे.
2 / 6
दरम्यान, आता पूजा चव्हाण हिने अखेरच्या काळात यवतमाळ ते पुणे हा ५७४ किमीचा प्रवास कसा काय आणि कमी वेळात केला, असा प्रश्न समोर आला आहे. तसेच या प्रवासाला किमान १० ते १२ तास लागतात मात्र पूजाने विमान प्रवास करून हे अंतर कापले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
3 / 6
६ फेब्रुवारी रोजी पूजा अरुण राठोड या तरुणीचा गर्भपात करण्यात आला. तर ७ फेब्रुवारी रोजी रात्री पुण्यामध्ये पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. दरम्यान, पूजा राठोड या तरुणीला गर्भपातानंतर दुपारीच डिस्चार्ज दिला गेला होता. त्यानंतर पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या घटनाक्रमात काही तासांचंच अंतर असल्याने गुंता वाढला आहे.
4 / 6
दरम्यान, यवतमाळ ते पुणे हे ५७४ किमी अंतर कमी वेळात गाठण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे गर्भपात करून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पूजाला हवाई मार्गे पुण्यात आणले गेले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर ते पुणे हा प्रवास करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर पूजाला नागपूरमधून पुण्याला विमानातून आणले गेले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5 / 6
त्यात पूजा अरुण राठोडचा गर्भपात आणि पूजा चव्हाणची आत्महत्या या दोन्ही घटनांमध्ये अरुण राठोड हे नाव समान आहे. त्यातच यवतमाळमध्ये झालेला गर्भपात आणि पुण्यातील आत्महत्या या घटनांमध्ये काही तासांचेच अंतर आहे. मात्र एवढ्या कमी वेळात पूजा ही यवतमाळवरून पुण्यात आली कशी, कुठल्या वाहनातून तिने प्रवास केला, असा प्रश्न निर्माण झालाय.
6 / 6
दरम्यान, यवतमाळमध्ये उपचारांसाठी पूजाचा पत्ता हा तिचे वास्तव्य असलेल्या पुण्यातील तसेच तिचे गाव असलेल्या परळीमधील न देता तो नांदेडमधील देण्यात आला होता.
टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणCrime Newsगुन्हेगारीSanjay Rathodसंजय राठोड