शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! मधुचंद्राच्या रात्रीच पती बनला शैतान, पाळी आलेल्या पत्नीला मारलं अन् केला तिच्यावर रेप....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 4:55 PM

1 / 8
इजिप्तमध्ये एका टीव्ही शोमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीननंतर महिलांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवांबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. या पोस्टमध्ये एका महिलेने सांगितलं की, तिचा पती फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता. पण जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा तो तिच्यासोबत फार वाईट वागला. त्यामुळे तिचं पूर्ण आयुष्य बदललं.
2 / 8
या महिलेच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, तो माणूस शानदार होता. पण आमच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं, तेव्हा मी प्रेग्नेंट होते आणि माझी डिलिव्हरी होणार होती. अशात आमचं भांडण झालं. ज्यानंतर त्याने मला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
3 / 8
या महिलेने पुढे लिहिले की, त्याने माझ्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने माझा रेप केला. त्यामुळे माझं मिसकरेज झालं होतं. मी एका मोठ्या लढाईनंतर माझ्या पत्नीला घटस्फोट दिला होता. पण आजही बाळ गमावण्याचं दु:खं मनात आहे.
4 / 8
त्यासोबत एका ३४ वर्षीय दुसऱ्या महिलेने पोस्टमध्ये लिहिलं की, मधुचंद्राच्या रात्री मला पिरीयड्स होते. त्यामुळे मी त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई केली होती. त्याला वाटलं की, मी त्याला उगाच रोखत आहे. त्यानंतर त्याने मला मारलं आणि माझा रेप केला.
5 / 8
नॅशनल कॉउन्सिल फॉर वीमेनच्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी सरासरी ६५०० अशा केसेस इजिप्तमध्ये समोर येतात, ज्यात पती द्वारे महिलांवर मॅरिटल रेप, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्ती अशा घटना असतात.
6 / 8
वीमेन सेंटर फॉर गायडन्सचे वकील आणि एक्झिक्युटीव डायरेक्टरांनी बीबीसीसोबत बोलताना सांगितलं की, इजिप्तमध्ये एक कल्चर फारच सामान्य आहे. ज्यानुसार एक महिला आपल्या पतीसाठी संबंध बनवण्यासाठी २४ तास उपलब्ध आहे. ज्यामुळे मॅरिटल रेपच्या अनेक घटना समोर येतात.
7 / 8
याप्रकरणी इजिप्तच्या इस्लामिक अॅडवायजरी बॉडीचे सदस्य दार एल-ईफ्ता म्हणाले की, जर एखादी व्यक्ती पत्नीवर संबंध ठेवण्यासाठी हिंसा करत असेल तर महिलेला पूर्ण हक्क आहे की, ती तिच्या पतीविरोधात तक्रार करू शकते आणि त्याला शिक्षा देऊ शकते.
8 / 8
तरी सुद्धा गेल्या दोन वर्षात वीमेन सेंटर फॉर गायडन्सने २०० पेक्षा अधिक मॅरिटल रेप केस नोंदवल्या आहेत. दरम्यान डब्ल्यूएचओनुसार, मॅरिटल रेप एकप्रकारची लैंगिक हिंसा आहे. पण इजिप्तच्या कायद्यांमध्ये मॅरिटल रेपला अपराध मानलं जात नाही.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी