शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉर्न व्हिडिओ बनवण्यासाठी मॉडेल्ससोबत जबरदस्ती, निर्मात्याला 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 2:34 PM

1 / 8
अमेरिकेतील एका पॉर्न वेबसाइटच्या निर्मात्याला 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्मात्यावर खोटे बोलून आणि फसवणूकी करून महिलांना सेक्स व्हिडिओमध्ये काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. कॅलिफोर्नियाची ही पॉर्न वेबसाइट आता बंद झाली आहे.
2 / 8
31 वर्षीय रूबेन आंद्रे गार्सिया 2013 ते 2017 पर्यंत वेबसाइटचा निर्माता, अभिनेता आणि रिक्रूटर होता. गार्सियाच्या जाहिराती पाहून आलेल्या महिलांना सांगितले जात होते की, या महिलांचे व्हिडिओ इंटरनेटवरून वितरीत केले जाणार नाहीत.
3 / 8
गार्सिया या महिलांना सांगायचा की, हे व्हिडिओ केवळ खासगी डीव्हीडीवर वितरीत केले जातील. परंतु गार्सिया या सर्व महिलांशी खोटे बोलला कारण हे व्हिडिओ केवळ फी-आधारित वेबसाइटवरच नव्हे तर बर्‍याच पॉर्न साइटवर पोस्ट केले जात होते.
4 / 8
याशिवाय, काही महिलांनी असा आरोप केला होता की गार्सिया त्यांना ब्लॅकमेल करून पॉर्न फिल्म बनवत असे. अमेरिकेच्या अ‍ॅटॉर्नीच्या कार्यालयाच्या निवेदनानुसार, गार्सिया आणि त्याचे साथीदार कधीकधी या महिलांवर खटला भरण्याची, घरी जाणारी उड्डाणे रद्द करण्याची आणि व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता.
5 / 8
पोलिसांनी या प्रकरणात म्हटले आहे की, गार्सिया बनावट मॉडेलिंगच्या जाहिरातींच्या सहाय्याने मुलींना बोलावत असे, नंतर त्यांच्याशी खोटी आश्वासने देऊन आणि त्यांच्याशी छेडछाड करीत असे आणि या महिलांना फसवल्यानंतर तो त्यांचा एडल्ट व्हिडिओ फिल्म बनवत होता.
6 / 8
अमेरिकेच्या अटॉर्नी रँडी ग्रॉसमॅन यांनी या प्रकरणात सांगितले की, या पीडित महिलांनी बर्‍याच वेळा सांगितले की, गार्सियाच्या या कृतीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होईल, परंतु असे असूनही गार्सियाने या मुलींच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याची काळजी घेतली नाही.
7 / 8
ते पुढे म्हणाले की, हे प्रकरण फसवणूकीचे आणि लोभाचे आहे आणि गार्सियाच्या कृतींचे कोणतेही जस्टिफिकेशन नाही. या प्रकरणात, गार्सियाला 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या व्यतिरिक्त अन्य 6 जणांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
8 / 8
दरम्यान, या पॉर्न वेबसाइटचे सह-निर्माता मायकेल जेम्स पॅट अद्याप फरार आहे. या व्यक्तीचा बराच काळ पोलिस शोध घेत आहेत आणि मायकेल जेम्सविषयी माहिती देण्यासाठी पोलिसांनी 50 हजार डॉलर्सचे बक्षीसही ठेवले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हाAmericaअमेरिका