The prostitution began in the guest house; 10 arrested including 4 girls
गेस्ट हाऊसमध्ये सुरु होता देह व्यापार; ४ मुलींसह १० जणांना अटक By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:13 PM1 / 7ग्रेटर नोएडा येथील दोन गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी टीम तयार केल्यानंतर छापा टाकला. गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकासह चार महिलांसह 10 जणांना पोलिसांनी अटक केली. माहितीच्या आधारे बुधवारी सकाळी कसना पोलिसांच्या पथकाने इकोटेक वन पोलिसांसह दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीची कारवाई करत सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.2 / 7यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी विशाल पांडे म्हणाले की, छाप्यादरम्यान प्रशांत गेस्ट हाऊस आणि प्रधान गेस्ट हाऊसमध्ये उघडपणे देह व्यापार सुरू होता. सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला आणि आरोपींना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी 4 महिला आणि 6 तरुणांना अटक केली आहे. याशिवाय प्रशांत गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे.3 / 7छापेमारी दरम्यान पोलिसांना गेस्ट हाऊसमधून बऱ्याच आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय गेस्ट हाऊसच्या खोल्यांमधून पोलिसांनी 15,620 रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी 4 महिलांसह सर्व लोकांना अटक केली आणि त्यांना कसना पोलिस ठाण्यात आणले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. या सेक्स रॅकेटचे जाळे देशातील इतर राज्यांशीही जोडलेले असल्याचे पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून लवकरच पोलिस या टोळीशी संबंधित इतर लोकांपर्यंत पोहोचतील. 4 / 7नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की, बर्याच काळापासून शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार चालवण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे, त्यामुळे पोलिस आयुक्त आलोक सिंग यांनी शहरातील सर्व स्पा सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.5 / 7अलीकडेच, नोएडामधील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटवर छापा टाकण्याच्या वेळी पोलिसांनी पकडलेल्या सर्व मुला-मुलींना अटक केली, तेथून पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या होत्या. या व्यतिरिक्त नोएडा पोलिस ठाण्याचे क्षेत्र ५८ मधील सेक्टर ६१ मध्ये असलेल्या शोप्रिक्स मॉलमधील माहिती देणाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.6 / 7जिथे स्पाच्या नावाखाली देह व्यापार चालू होता. तिथे आक्षेपार्ह वस्तूसह मॉलच्या मालक, मालकासह 14 मुली आणि 9 तरुणांना पोलिसांनी अटक केली आणि घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू आणि अमली पदार्थही जप्त केले.7 / 78 डिसेंबर 2020 रोजी, नोएडामधील स्पा सेंटरवर छापे टाकताना पोलिसांनी 7 महिलांसह 18 लोकांना अटक केली. छाप्यादरम्यान ज्यांना वेगवेगळ्या खोल्यांमधून आक्षेपार्ह अवस्थेत या लोकांना पकडले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications