शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिल्यांदाच POCSO अंतर्गत एका महिलेला शिक्षा; मुलीसोबत दुष्कृत्यात भावाला दिली साथ

By पूनम अपराज | Published: March 04, 2021 4:52 PM

1 / 7
हे प्रकरण बिहारच्या भागलपूर जिल्ह्याशी संबंधित आहे. विशेष पॉक्सो कोर्टाचे न्यायाधीश रोहित शंकर यांच्या कोर्टाने आरोपीने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात सहकार्य केल्याबद्दल आरोपीच्या बहिणीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
2 / 7
सोमवारी मुजाहिदपूर मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या पिंकीला पॉक्सो कायद्याच्या कलम 21 नुसार शिक्षा सुनावली आहे. याआधी तुरुंगात घालविलेला कालावधी कमी करून पिंकीला शिक्षा सुनावण्यास सांगण्यात आले आहे.
3 / 7
शनिवारी पिंकी गुन्हेगार असल्याचे कोर्टाने सिद्ध झाले. आपल्या भावाच्या प्रत्येक कृत्याची तिला माहिती होती असा आरोप पिंकीवर करण्यात आला. पीडितेला मदत करण्याऐवजी तिने आपल्या धाकट्या भावाला घाणेरड्या कृतीत पाठिंबा दिला.
4 / 7
विशेष सरकारी वकील शंकर जयकिशन मंडलने सरकारच्या वतीने युक्तिवाद केला की, पॉक्सो कायद्यात पहिल्यांदा एखाद्या महिलेला शिक्षा सुनावण्यात आली.
5 / 7
भागलपूरमधील मोजाहिदपुर   पोलीस स्टेशन अंतर्गत हे प्रकरण २०१६ सालचे आहे. मोजाहिदपुर  परिसरातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीचे अपहरण केले. कित्येक दिवस तिच्याशी गैरवर्तन केले.
6 / 7
त्याच्या तावडीतून पंधरा वर्षाचा विद्यार्थिनीने पळ काढून घर गाठलं आणि  कुटुंबियांना आपबिती सांगितली, तेव्हा घरातील सदस्यांनी खूप त्रास झाला.
7 / 7
पीडितेच्या कुटूंबियांनी मोजाहिदपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीओसीएसओ कायद्याने ही शिक्षा सुनावली.
टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसCourtन्यायालयSexual abuseलैंगिक शोषणJharkhandझारखंड