शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raj Kundra: राज कुंद्राला अटक, बॉलिवूडला पहिला दणका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ‘ऑपरेशन क्लीन’ काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 1:15 PM

1 / 10
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी मुंबई क्राईम ब्रांन्चने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रासारख्या मोठ्या हस्तकाला अटक करणं हे मुंबई फिल्म इंडस्ट्रीत सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन क्लीन’चा पहिला टप्पा आहे.
2 / 10
माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हे बॉलिवूडमधील घाण संपवण्याबाबत गंभीर आहेत. त्याची जबाबदारी आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे(Hemant Nagrale) यांच्यावर सोपवली आहे. सध्या हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.
3 / 10
बॉलिवूडमध्ये संघटित माफिया काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. अवैध व्यवसाय आणि अन्य कलाकारांवर सिनेमात काम मिळण्यापासून रोखलं जातं. धमकी देऊन त्यांना मजबूर केले जाते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कडक पाऊलं उचलण्याचं ठरवलं आहे.
4 / 10
राज कुंद्रा नेहमी आयपीएल सट्टेबाजी, इक्बाल मिर्चीसोबत संबंध तसेच अनेक कलाकारांनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एका अँपवरून राज कुंद्रा चर्चेत होता. मालाडमध्ये पोलिसांनी छापेमारी केली तरी बॉलिफेम नावानं नवीन ओटीटी लॉन्च केला होता.
5 / 10
या OTT वर कन्टेंट रेटिंग सेक्सुअर थीम्स सांगितलं जात होतं. या प्लॅटफॉर्मवर गायिका पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छलने एक वेबसिरीज केली होती. ज्यात एका ऑटोमध्ये लागलेल्या हिडन कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रवाशांच्या हालचाली कैद केल्या होत्या. या वेब सिरीजनंतर मुंबई पोलिसात तक्रार दाखल झाली होती.
6 / 10
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हेमंत नगराळेंना स्पष्ट सांगितलं होतं की, आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये साफसफाई करण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून वेब सिरीज, टीव्ही सिरीजशिवाय ओशिवारा, गोरेगाव, मालाड, मड आयलँड, मालवणीसारख्या परिसरात होणाऱ्या शुटींगबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं
7 / 10
मुंबई पोलिसांसोबत महाराष्ट्रातील दुसऱ्या शहर आणि जिल्हा पोलिसांनाही निर्देश देण्यात आले. कोणत्याही कलाकारावर आणि तंत्रज्ञानावर दबाव आणण्याच्या तक्रारी आल्या तर तात्काळ यावर पोलीस कारवाई करावी. मुंबई पोलीस सध्या अशा लोकांचा शोध घेत आहेत जे बाहेरून आलेल्या कलाकारांना धमकावून त्यांचे शोषण करत आहेत.
8 / 10
यात मोठ्या संख्येने छोट्या शहरातून आलेल्या मुलींचा समावेश आहे. मराठी कलादिग्दर्शक राजू सापते यांनी नुकतीच आत्महत्या केली. ज्यात काही यूनियनकडून त्यांना धमकावण्याचा आरोप करण्यात आल्याने ते चिंतेत होते. गहना वशिष्ठ, पूनम पांडे, शर्लिन चोपडा आणि सागरिका सोनम नावाच्या मॉडेलने राज कुंद्रावर गंभीर आरोप लावले आहेत.
9 / 10
हे कलाकारांना काम देण्याच्या बहाण्याने कागदांवर त्याच्या सह्या घेतात आणि त्यानंतर मनमर्जीप्रमाणे काम बदललं जातं. न्यूड ऑडिशनबाबत मागणी करणं हादेखील या गोरखधंद्याचा एक भाग आहे. राज कुंद्रावर आता आरोप करणारे पुढे येत आहे. मात्र यानिमित्ताने बॉलिवूडमधील मोठ्या गटाला कारवाईचा धक्का बसला आहे.
10 / 10
काही लोक राज कुंद्राला दोषी ठरवत आहेत तर काहींना हा कटकारस्थानाचा भाग असल्याचा संशय आहे. आता एक लोकप्रिय युट्यूबर राजच्या विरोधात मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अश्लील व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे. पुनीत कौर (Puneet Kaur) असे या युट्यूबरचे नाव आहे.
टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai policeमुंबई पोलीसShilpa Shettyशिल्पा शेट्टी