शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 4:15 PM

1 / 8
राजस्थानच्या कोटामध्ये एका व्यक्तीने काही पैशांसाठी भाऊ बनून आपल्याच पत्नीचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिलं. पीडित व्यक्तीने महिला, तिचा पती आणि मध्यस्थ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना फसवणुकीच्या तक्रारीवरून अटक केली.
2 / 8
ही घटना कोटाच्या कुन्हाडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रवि काली नावाच्या तरूणाचं लग्न होतं नव्हतं. त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितलं की, देवराज नावाचा एक व्यक्ती त्याचं लग्न जुळवून देईल.
3 / 8
यानंतर रवि देवराजला भेटला आणि लग्नाविषयी चर्चा केली तर त्याने सांगितलं की, त्याचे सगे-सोयरे इंदुरमध्ये राहतात. तिथे तो लग्न जुळवून देईल. यासाठी देवराजने १ लाख ८० हजार रूपयांची मागणी केली. ज्यासाठी रवि सुद्धा तयार झाला.
4 / 8
पुढे देवराजने इंदुरमध्ये रविचं लग्न कोमल नावाच्या मुलीसोबत कोर्टात लावून दिलं आणि १ लाख ८० हजार रूपये घेतले. लग्नानंतर रवि आपल्या पत्नीला घेऊन घरी आला. रविची पत्नी कोमलने दोन दिवसांनंत आपला भाऊ सोनूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यानंतर रविने तिच्या भावाला बोलवून घेतलं.
5 / 8
रविच्या घरी पोहोचताच सोनूने कोमलला बघून सांगितलं की, ही त्याची पत्नी आहे आणि ती आधीच विवाहित आहे. इतकंच नाही तर त्याने हेही सांगितलं की, ती त्याच्या मुलांची आई आहे. हे ऐकून रविच्या पायाखालजी जमिनच सरकली आणि त्याची फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
6 / 8
रविने पोलिसात जाऊन देवराज, पत्नी कोमल आणि तिच्या कथित भाऊ सोनू विरोधात तक्रार दाखल केली. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली आणि जे समोर आलं ते समजल्यावर रविला धक्काच बसला. ज्या सोनूला तो आपल्या पत्नीचा भाऊ समजत होता तो मुळात कोमलचा पती निघाला.
7 / 8
पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, दलाल देवराजने कोमल आणि सोनूसोबत मिळून रविला फसवण्याचा प्लॅन केला होता. याच कारणाने कोमलच्या पतीलाच तिचा भाऊ बनवलं आणि त्याने रविसोबत पत्नीचं लग्न लावून दिल. त्या बदल्यात पैसे घेतले.
8 / 8
पोलिसांनी तिन्ही आरोपींना फसवणुकीच्या आरोपात अटक केली आणि तुरूंगात पाठवला. तसेच पोलीस पुढील चौकशी करत आहे.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नRajasthanराजस्थान