शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नर्सचा न्यूड व्हिडिओ बनवून बलात्कार सुरूच, होणाऱ्या नवऱ्याला पाठवले फोटो; वडिलांनी दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:41 PM

1 / 9
बिजोलियन परिसरातील अरोली गावात राहणार्‍या मेडिकल स्टोअरचालकाविरुद्ध पीडित महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बिजोलियन पोलिस स्टेशनचे अधिकारी कैलाश चंद्र यांनी सांगितले की, पीडित परिचारिका मुलीने अहवालात आरोप केला आहे की, दोन वर्षांपूर्वी अरोली गावातील मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस म्हणून काम करण्याचा प्रस्ताव आरोपी मेडिकल ऑपरेटरने आणला होता.
2 / 9
नर्सची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पीडितेने मेडिकलमध्ये काम करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. पीडित तरुणी 20 दिवस नियमितपणे मेडिकल स्टोअरमध्ये जात होती. या वेळी मेडिकल ऑपरेटरने मुलीला फूस लावून परिसरातील बेरिसाल गावाजवळील हायवेच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये नेले आणि तेथे बुक केलेल्या खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध बनवून तिच्यावर बलात्कार केला.
3 / 9
आरोपीने आपल्या मोबाईलवरून मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. हॉटेलमध्ये न्यूड फोटो काढल्यानंतर आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर मुलगी घाबरली, कुटुंबीयांची बदनामी होईल या भीतीने घरातील कुणालाही या घटनेची माहिती दिली नाही. सुमारे दीड वर्षांपासून मेडिकल ऑपरेटरने मुलीच्या इच्छेविरुद्ध राज्यातील विविध हॉटेल्स आणि बिजोलिया, भिलवाडा, सालवटीया येथे तिच्याच गाडीत बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवले.
4 / 9
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देऊन अनेकवेळा बलात्कार केला. ६ महिन्यांपूर्वी आरोपी हरिसिंग रावत याने मुलीच्या वडिलांना फोन करून मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले.
5 / 9
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देऊन अनेकवेळा बलात्कार केला. ६ महिन्यांपूर्वी आरोपी हरिसिंग रावत याने मुलीच्या वडिलांना फोन करून मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे, असे सांगितले. बऱ्या बोलाने लग्न लावून दिले तर, नाहीतर तुमच्या मुलीचे अश्लील व्हिडीओ फोटो आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल कारेन. दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा विचारही करू नका, असं धमकावलं.
6 / 9
पीडितेच्या वडिलांनी आरोपीला आपल्या मुलीशी लग्न करण्यास मनाई केली. पीडितेच्या होणारी नवऱ्याला व्हॉट्सअॅपवर मुलीचा अश्लील फोटो पाठवून लग्न मोडले. आरोपी हरिसिंग रावत याला पीडित मुलीचे तिचे लग्न तुच्या वडिलांनी दुसऱ्या मुलाशी जमवले होते याची माहिती होती. 
7 / 9
पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती १९ फेब्रुवारी रोजी एका खासगी रुग्णालयात ड्युटीवर होती. त्याचवेळी आरोपी आला आणि फूस लावून अजमेरला आरोपीच्या बहिणीच्या ठिकाणी घेऊन गेला. तेथेही त्याने जबरदस्ती इच्छेविरुद्ध चुकीचे कृत्य केले.
8 / 9
त्यानंतर जयपूरमध्ये तीन दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर तेथेही तो दुष्कर्म करत राहिला. पीडित मुलीच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली असता आरोपीने त्यांच्या बाजूने जबाब देण्याची धमकी दिली. मुलगी बेपत्ता झाल्याबद्दल वडिलांनी बिजोलिया पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांना आरोपीच्या बाजूने जबाब देण्याची धमकी दिली.
9 / 9
आरोपी विवाहित असून वारंवार धमक्या देत असल्याचे मुलीला समजल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले. आरोपी हरिसिंग रावत हा विवाहित असून तो तरुणीला जबरदस्तीने पत्नी बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुलीला समजले. शुक्रवारी पीडिता तिच्या वडिलांसह बिजोलियन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचली. पोलिसांनी भादंवि कलम ३६६, ३७६ आणि ३४४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ