जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 18:41 IST
1 / 5राजस्थानमधील हनुमानगड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जामिनावर बाहेर आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पीडितेच्या शरीरावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली असून, तिला गंभीर अवस्थेत बिकानेरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 / 5पीडितेने दोन वर्षांपूर्वी आरोपी प्रदीप बिश्नोईविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान, आरोपी जामिनावर बाहेर आहे. पीडितेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून, काही दिवसांपासून ती आपल्या पतीपासून विभक्त होऊन आजीकडे राहत होती. दरम्यान पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून आरोपीला पकडले असून, त्याची चौकशी सुरू आहे. 3 / 5पीडितेच्या आजीच्या घराजवळ CCTV कॅमेरा लावलेला आहे. त्यामध्ये एक तरुण दुचाकीवरून येताना दिसत आहे. तसेच ब्युटी पार्लरच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो बाहेर पळताना दिसत आहे. आरोपी घराच्या भिंतीवरून घरात आला आणि पळताना मुख्य गेट खोलून बाहेर पळून गेला. असे पीडितेच्या आजीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 4 / 5आरोपीने घराच्या आवारात प्रवेश केल्यावर पीडितेला बाहेर बोलावले. त्यानंतर ती बाहेर आल्यावर तिच्यावर रॉकेल टाकून आग लावली. पीडितेने सिंथेटिक कपडे परिधान केले होते. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली. या दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. 5 / 5मिळालेल्या माहितीनुसार पीडिता गेल्या काही काळापासून आपल्या पतीपासून वेगळी होत आजीसोबत राहत होती. तसेच ब्युटी पार्लर चालवून उदरनिर्वाह करत होती. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची आता चौकशी सुरू आहे.