घबाड सापडले! रेल्वेचे रविश कुमार 'काळ्या धनाचे कुबेर'; सीबीआयचा छापा By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 1:56 PM
1 / 10 बिहारमध्ये रेल्वेच्या मुख्य अभियंत्याच्या घरी घबाड सापडले आहे. तो काळ्या धनाचा कुबेर होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (सर्व फोटो प्रातिनिधीक) 2 / 10 सीबीआयने टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडे 183 टक्के अधिक कमाई सापडली आहे. सीबीआयने बुधवारी देशव्यापी छापे टाकले होते. 3 / 10 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर देशभर केलेल्या कारवाईत बुधवारी सीबीआयने पूर्व मध्य रेल्वे, हाजीपूरचे मुख्य़ इंजिनिअर रविश कुमार यांच्या घरावर छापा मारला. यावेळी त्यांच्याकडे 183 टक्के अधिक संपत्ती आढळून आली. 4 / 10 रविश कुमार यांच्या पटना येथील घर आणि सासरवाडीवरही छापे टाकण्यात आले. तसेच बिहारशरीफ येथील वडिलोपार्जित घराकडेही सीबीआय पोहोचली होती. 5 / 10 या छाप्यात 76 लाख रुपये रोख, जमीन-घर आदींचे 15 कागदपत्रे हाती लागली आहेत. तसेच जवळपास 50 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. 6 / 10 त्यांच्या दोन घरांमधून ही रक्कम सापडली आहे. त्यांचे सासरे कामगार आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडेच मोठी रक्कम सापडली आहे. वडिलोपार्जित घरावरही छापेमारी सुरु आहे. 7 / 10 सीबीआयच्या छाप्यात रविश कुमार यांचे दोन फ्लॅट आणि काही प्लॉट खरेदी समोर आली आहे. पटनाच्या राजाबाजारासह उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये फ्लॅट आहेत. तर सोनपूर आणि खगौलमध्ये काही जमिनी मिळाल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. 8 / 10 रविश कुमार यांनी 2009 ते 2020 पर्यंत नातेवाईकांच्या नावे मोठी संपत्ती जमा केली. त्यांचा पगार आणि इतर उत्पन्न मिळून 1 कोटी रुपये होते. तर त्यांच्या पत्नीचे 40 लाख रुपये उत्पन्न होते. 9 / 10 या काळात त्यांचा खर्च 67.41 लाख रुपये आहे. यानुसार त्यांची बचत 76.59 लाख रुपये व्हायला हवी असे सीबीआयचे म्हणणे आहे. 10 / 10 याच्या तुलनेत त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांच्या नावावर त्यांनी 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. शिलकीपेक्षा रोख सापडलेली रक्कमच जास्त आहे. आणखी वाचा