Recovered fake notes worth more than 25 crores from an ambulance in Surat, Gujarat by police
रुग्णवाहिकेत सापडले तब्बल २५ कोटी रुपये; पोलीस चौकशीत समोर आला वेगळाच ट्विस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:42 AM1 / 9गुजरातच्या सूरत येथे पोलिसांनी २-२ हजारांच्या बनावट नोटांनी भरलेला बॉक्स एका रुग्णवाहिकेतून जप्त केला आहे. रुग्णवाहिकेचा वापर गरजू रुग्णांच्या वापरासाठी केला जातो परंतु सूरतमध्ये बनावट नोटांची अफरातफर करण्यासाठी रुग्णवाहिकेचा गैरवापर होत असल्याचं समोर आले. 2 / 9या बॉक्समध्ये २५ कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी भारतीय रिवर्स बँक ऑफ इंडिया आणि केवळ सिनेमा शूटींग असं लिहिण्यात आले होते. 3 / 9पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरत शहरात जनसभेला संबोधित करण्यासाठी आले होते. त्याचवेळी सूरतच्या कामरेज भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडल्या आहेत. 4 / 9२-२ हजारांच्या तब्बल २५ कोटी रुपये असलेल्या नोटा सापडल्याने खळबळ माजली. नेमका हा प्रकार काय हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. सूरत पोलिसांनी अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 5 / 9सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कशी केली कारवाई? हे जाणून घेऊया. कामरेज येथील पोलीस पथकाने हायवेवरील शिवशक्ती हॉटेलजवळ नाकाबंदी केली होती. त्यावेळी या रुग्णवाहिकेला थांबवण्यात आले. 6 / 9मूळचा जामनगरमधील असलेला वाहन चालक हितेश कोटदिया याला रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडण्यात सांगून तपासणी केली. तेव्हा आतमध्ये ६ बॉक्स आढळले ज्यात १२९० दोन हजारांच्या नोटांचे बंडल होते. त्याची किंमत २५ कोटी ८० लाख होती. 7 / 9ज्या रुग्णवाहिकेतून या नोटा जप्त करण्यात आल्या. त्यावर दीकरी एज्युकेशन ट्रस्ट, मोटा वडाला सूरत असे लिहिले होते. त्याचसोबत गौ माता राष्ट्र माता असा उल्लेख होता. रुग्णवाहिकेत २५ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याची बातमी मिळताच सूरतचे एसपी हितेश जॉयसर हेदेखील घटनास्थळी पोहचले. 8 / 9सुरुवातीला रुग्णवाहिकेची पाहणी करत एसपींनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात केली. रुग्णवाहिकेत जप्त करण्यात आलेल्या नोटा लांबून पाहिल्या खऱ्या असल्याचा भास होता. खऱ्या २ हजारांच्या नोटेप्रमाणेच या नोटा आहेत. 9 / 9परंतु जवळून पाहिल्यास त्या नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी भारतीय रिवर्स बँक ऑफ इंडिया आणि केवळ सिनेमा शूटींगसाठी असं दिसून येते. सध्या रुग्णवाहिका चालकाची चौकशी सुरू आहे. या बनावट नोटा कुठे घेऊन जात होते? जर सिनेमाच्या शूटींगसाठी याचा वापर होणार असेल तर तो सिनेमा कोणता आणि कुठे शूटींग सुरू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications