Richard Ramirez is the worlds most dreaded serial killer know about night stalker
जगातला सर्वात क्रूर सीरीअल किलर, एक-दोन नाही तर १९ वेळा मिळाली होती मृत्यूदंडाची शिक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 3:36 PM1 / 6Worlds Most Dreaded Serial Killer: तुम्ही सिनेमात अनेक सीरिअल किलर्स पाहिले असतील. खऱ्या आयुष्यातही काही सीरीअर किलर्स असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात खतरनाक सीरीअल किलरबाबत सांगणार आहोत. त्याचं नाव ऐकताच थरकाप पडतो. या क्रूर माणसाचं नाव आहे रिचर्ड रेमिरेज. त्याला Night Stalker नावानेही ओळखलं जातं. या सीरीअल किलरवर १३ हत्या, ५ हत्येचे प्रयत्न, ११ रेप आणि १४ दरोडे इतके गुन्हे होते. या सैतानाला कोर्टाने एक दोनदा नाही तर १९ वेळा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या गुन्हेगाराने अमेरिकेतील कॅलिफोर्नियात हैदोस घातला होता.2 / 6जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायाधीशांनी निर्णय देतांना सांगितलं की, 'याने केलेले गुन्हे कोणत्याही माणसाच्या समजण्या पलिकडचे क्रूर आहेत आणि त्याने सगळ्या सीमा पार केल्या'. २० नोव्हेंबर १९९ मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्याचा २०१३ मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला.3 / 6रिचर्ड रेमिरेज प्रत्येकवेळी गुन्हा केल्यावर एका खासप्रकारचा निशाण करून जात होता. या निशाणाचा अर्थ होतो ‘सैतान जिंदाबाद’. तो नेहमीच भींतीवर किंवा मृतदेहाच्या पायावर निशाण सोडून जात होता. इतकंच नाही तर तो लोकांकडून 'सैतान जिंदाबाद' असं म्हणून घेत होता.4 / 6हा गुन्हेगार पोलिसांच्या हातीच लागत नव्हता. पण एकदा पोलिसांना घटनास्थळावरून त्याच्या शूजचे निशाण सापडले होते. ज्यावरून हे समजलं की, रिचर्ड एविया नावाच्या ब्रॅन्डचा शूज घालतो. हा ब्रॅन्ड खासप्रकारच्या लोकांना पसंत होता. या शूजमुळेच किलरची ओळख पटली होती.5 / 6एकदा रेमिरेज कॅलिफोर्नियाच्या एका घरात शिरला होता. तिथे त्याने एका व्यक्तीची हत्या केली आणि त्याच्या पत्नीसोबत रेप केला. या महिलेने नंतर रिचर्ड रेमिरेजचं स्केच तयार केलं होतं. या स्केचमुळे लॉस एजेंलिसमध्ये लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.6 / 6जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायाधीशांनी निर्णय देतांना सांगितलं की, 'याने केलेले गुन्हे कोणत्याही माणसाच्या समजण्या पलिकडचे क्रूर आहेत आणि त्याने सगळ्या सीमा पार केल्या'. २० नोव्हेंबर १९९ मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्याचा २०१३ मध्ये कॅन्सरने मृत्यू झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications