Ruja Ignatova: पेशाने डॉक्टर, रूप मॉडेलसारखं, पण काम असं की आहे मोस्ट वाँटेड, पाहा कोण आहे ती? By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:41 PM
1 / 9 एफबीआयने हल्लीच टॉप मोस्ट वाँटेडची अपडेटेड सूची प्रसिद्ध केली आहे, यामध्ये क्रिप्टोकरन्सी फ्रॉड करणाऱ्या रुजा इग्नातोव्हा हिचाही समावेश आहे. 2 / 9 या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत एफबीआयने ज्या तरुणीला ठेवलं आहे. ती पेशाने डॉक्टर आहे. तसेच तिच्या सौंदर्यासमोर भल्या भल्या मॉडेल्स फिक्या पडतील एवढी ती सुंदर आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती वेगवेगळ्या देशातील पोलिसांना चकवा देत आहे. 3 / 9 क्रिप्टोक्विन नावाने प्रसिद्ध असलेल्या या वाँटेड तरुणीचं खरं नाव रुजा इग्नातोव्हा आहे. तसेच तिच्यावर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावावर तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 4 / 9 रुजा इग्नातोव्हा मुळची बुल्गारिया येथील रहिवासी आहे. तसेच ती पेशाने डॉक्टर आहे. बिटकॉईनचं यश पाहून तिने वनकॉईन लाँच केलं होतं. तसेच भविष्यात वनकॉईन जगामध्ये सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी राहील आणि त्यात मोठा नफा होईल, असे आमिष तिने दाखवले होते. 5 / 9 रुजा इग्नातोव्हा वर फ्रॉड केल्याचे ८ गुन्हे नोंद आहेत. आरोप आहे की, रुजा इग्नातोव्हाच्या कंपनीने क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एजंट्सना कमिशनही दिले होते. मात्र २०१७ मध्ये तिचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ती फरार आहे. 6 / 9 एफबीआयने रुजा इग्नातोव्हा हिची माहिती देणाऱ्याला १००००० डॉलर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. एफबीआयने रुजा इग्नातोव्हा हिचा समावेश टॉप मोस्ट वाँटेडच्या लिस्टमध्ये समावेश केला आहे. एफबीआयच्या मते तिला पकडणे सोपे होईल. 7 / 9 रुजा इग्नातोव्हा हिने वनकॉईन नावाच्या या क्रिप्टो स्कॅमची सुरुवात २०१६ मध्ये केली होती. रुजा हिने सुरुवातीला वनकॉईनच्या लाँचिंगनंतर लंडनपासून दुबईपर्यंत सेमिनार आयोजित करत असे. 8 / 9 भविष्यात वनकॉईन जगातील नंबर १ क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनलाही मागे टाकेल, असा दावा ती तिच्या सेमिनारमधून करत असे. तिच्या जाळ्यात येऊन जगातील विविध देशातील लोकांनी गुंतवणूक केली. 9 / 9 रुजाच्या गोड बोलण्याला भुलून लोक तिच्या वनकॉईनमध्ये गुंतवणूक करायचे. तिच्याकडे बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीकडे असलेल्या ब्लॉकचेनसारखी टेक्नॉलॉजी नाही याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. आणखी वाचा