Sachin Vaze: Accused Vinayak Shinde had posted a Facebook post on the day of Mansukh Hiren murder
Sachin Vaze: बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं... By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 9:32 AM1 / 12मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी २५ फेब्रुवारीच्या रात्री उभी करण्यात आली. ही स्कोर्पिओ कार मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यावसायिकाची होती, मनसुख हिरेन यांची हत्या ४ मार्च रोजी झाली. मुब्रा येथील खाडीकिनारी त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता.(Mukesh Ambani Bomb Scare) 2 / 12महाराष्ट्र एटीएसकडून मनसुख हिरेन मृत्यूचा तपास करण्यात येत होता, यात निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिन वाझे यांचाही हिरेन यांच्या हत्येत सहभाग असल्याचं समोर आलं होतं. 3 / 12एटीएसकडून हा तपास सध्या NIA कडे वर्ग करण्यात आला आहे, सध्या हे तिघंही NIA कोठडीत आहेत. विशेष म्हणजे ४ मार्च रोजी मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्याचदिवशी हत्येत सहभागी असणाऱ्या विनायक शिंदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. 4 / 12या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मला बुद्धिबळ आवडतं, त्यात एक नियम खूप चांगला आहे, डाव कोणीही टाकला तरी आपले आपल्याला मारत नाहीत, परंतु या उलट झालं. ही फेसबुक पोस्ट गुन्हेगाराकडून का टाकण्यात आली हे अद्याप कळू शकलं नाही. 5 / 12विनायक शिंदे यांनी तपास यंत्रणेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारे पोस्ट केली होती का? तो स्वत: पोलीसमध्ये होता त्यामुळे तपास भरकटण्यासाठी त्याने ही पोस्ट टाकल्याची शक्यता आहे. विनायक शिंदे याला २१ मार्च रोजी मनसुख हिरेन हत्येप्रकरणात अटक करण्यात आली. 6 / 12मात्र विनायक शिंदेला अटक करण्यापूर्वी त्याने आणखी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती, त्यात फक्त शॉकिंग असं लिहिलं होतं. हत्येच्यावेळी आणि हत्येनंतर विनायक शिंदे सोशल मीडियावर अशाप्रकारे सक्रीय होता जसं त्याला सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणात काहीही माहिती नाही7 / 12परंतु नवीन माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधी ३ मार्चला तत्कालीन सीआययू प्रमुख सचिन वाझे होते, ते मनसुख हिरेन यांच्यासोबत सचिन वाझे आणि विनायक शिंदे दोघंही उपस्थित होते, त्याचसोबत क्राईम ब्रांचमधील अन्य अधिकारीही हजर होते. 8 / 12या भेटीत मनसुख हिरेन यांना खूप समजवण्यात आलं की, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणात जबाबदारी घ्यावी, अटक व्हावी, त्यानंतर हिरेन यांना जामीनावर बाहेर काढण्यासाठी सचिन वाझे आणि सहकारी मदत करतील. परंतु मनसुख हिरेन यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट शिजला. 9 / 12गुजरातच्या क्रिकेट बुकी नरेश गोरने सचिन वाझेला सीमकार्ड दिले होते, याच सीमकार्डने ४ मार्च रोजी रात्री तावडे नावानं मनसुख हिरेन यांना कॉल करण्यात आला. त्यानंतर हिरेन यांना घोडबंदर परिसरात बोलवण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर सचिन वाझे तेथून ४० किलोमीटर दूर मुंबई पोलीस मुख्यालयात आले. 10 / 12त्यानंतर सचिन वाझे डोंगरी येथील एका बारमध्ये छापा टाकण्यासाठी गेले. आणि त्याचवेळी विनायक शिंदेने फेसबुकवर ‘अपने अपनो को नही मारते” अशी पोस्ट केली. एटीएसनुसार विनायक शिंदे आणि मनसुख हिरेन यांचं हत्येच्या दिवशी घोडबंदर परिसरातील लोकेशनचे पुरावे आहेत. 11 / 12महाराष्ट्र एटीएसला हिरेन प्रकरणाचा तपास ६ मार्चला दिला. ज्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या हत्येबद्दल विधानसभेत माहिती दिली आणि सचिन वाझे यांच्यावर संशय उपस्थित केला. त्याच्या २ दिवसात मुकेश अंबानींच्या घराबाहेरील प्रकरणाचा तपास NIA ने हातात घेतला. 12 / 12विनायक शिंदे हा पूर्वीपासून सचिन वाझे यांच्यासोबत सीआययू काम करत होता, त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री होती, परंतु मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनुसार विनायक शिंदे कधीही सीआययूमध्ये काम करत नव्हते, सचिन वाझे प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम करत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications