शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: सचिन वाझेची ‘बाईक डायरी’; प्रसिद्ध युट्यूबर ‘Mumbaikar Nikhil’ सोबत लडाख दौरा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:13 PM

1 / 12
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला. या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेभोवती फिरली.
2 / 12
सध्या NIA कडून सचिन वाझेची कसून चौकशी सुरू असून ७ एप्रिलपर्यंत त्याला NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. NIA च्या तपासात सचिन वाझेकडे महागड्या गाड्या असल्याचं दिसून आलं. त्याचसोबत एक स्पोर्ट्स बाईकही सचिन वाझे वापरत असल्याचं उघड झालं.
3 / 12
ही स्पोर्टस बाईक मीना जॉर्ज या मिस्ट्री वुमनच्या नावावर आहे. ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 लाख इतकी आहे. या मीना जॉर्जला काही दिवसांपूर्वी NIA ने अटक केली आहे. ही महिला सचिन वाझेला मदत करत असल्याचा आरोप आहे.
4 / 12
ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेचं पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं, त्यावेळी सचिन वाझेने ही स्पोर्ट्स बाईक खरेदी केली, इतकचं नाही तर या बाईकने सचिन वाझेने मुंबई ते लडाख बाईक राईडदेखील केली. याचा खुलासा आता समोर येत आहे.
5 / 12
सोशल मीडियात अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यात सचिन वाझे सुप्रसिद्ध युट्यूबर मुंबईकर निखीलसोबत लडाखला बाईक राईड करण्यासाठी गेल्याचं दिसून येत आहे. मुंबईकर निखील हा युट्यूबवर व्हिडीओ बनवतो. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.
6 / 12
या प्रकरणात आतापर्यंत आठ चार चाकी वाहने आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी आतापर्यंत एकूण नऊ वाहने जप्त केली आहे. या वाहनांचा उपयोग वाझे किंवा वाझेंच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा ‘NIA’चा संशय आहे.
7 / 12
दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला घेऊन NIA टीम सोमवारी रात्री उशीरा मुंबईतील CSTM रेल्वे स्टेशनवर पोहचली, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडात सचिन वाझे आरोपी आहे.
8 / 12
रात्री उशीरा NIA टीम क्राईम रिक्रिएट करण्यासाठी सचिन वाझेला रेल्वे स्टेशनला घेऊन गेली, याठिकाणी CCTV फुटेजसह इतर पुरावे गोळा करण्यासाठी वाझेला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर नेण्यात आलं.
9 / 12
यावेळी फॉरेन्सिक टीमदेखील उपस्थित होती, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सचिन वाझेला गाडीत बसवून पुन्हा NIA ने कळवा स्टेशनला नेलं. मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी सचिन वाझेने रेल्वेतून प्रवास केल्याचा NIA ला संशय आहे. त्यामुळे वाझेला स्टेशनला घेऊन गेले होते.
10 / 12
रात्री १० च्या सुमारास सचिन वाझेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन गेले. याठिकाणी पुणे फॉरेन्सिक विभागाची टीम आधीच हजर होती. यावेळी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
11 / 12
रात्री १० च्या सुमारास सचिन वाझेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन गेले. याठिकाणी पुणे फॉरेन्सिक विभागाची टीम आधीच हजर होती. यावेळी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
12 / 12
रात्री १० च्या सुमारास सचिन वाझेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला घेऊन गेले. याठिकाणी पुणे फॉरेन्सिक विभागाची टीम आधीच हजर होती. यावेळी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाYouTubeयु ट्यूब