शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze Case: 'प्रिय मुकेश भैया और नीता भाभी' धमकी पत्राचा प्रिंटर कोणाचा? NIA चा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:23 AM

1 / 10
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर (Mukesh Ambani Bomb Scare) ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याच्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. यानंतर हिरेन याचा खून (Mansukh Hiren Murder) झाला होता. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याने एनआयएने तपास हाती घेतला होता. आता एनआय़ए या प्रकरणातील एकेक कंगोरे समोर येऊ लागले आहेत. (SachinVaze, Vinayak Shinde Wrote letter to Mukesh Ambani and kept in Mansukh hiren Sqorpio.)
2 / 10
मनसुख हिरेन प्रकरणी एनआयएने न्यायालयामध्ये सांगितले की, सचिन वाझे आणि निलंबित पोलीस विनायक शिंदे यांनी एका भेटीत हिरेनला ठार मारण्याचा कट रचला होता.
3 / 10
मंगळवारी एनआयएने नवी मुंबईतील कामोठेतून एक कार जप्त केली. याच कारमध्ये सचिन वाझे आणि शिंदे यांनी मिळून मनसुख हिरेन यांचा गळा आवळल्याचा एनआयएला संशय आहे.
4 / 10
NIA च्या सुत्रांनुसार वाझे यांची ही सातवी कार आहे, जी तपास यंत्रणेने जप्त केली आहे. ही मित्सुबिशी कंपनीची आऊटलँडर कार आहे. ही पहिलीच गाडी अशी आहे जी वाझेच्या नावावर रजिस्टर आहे. मात्र, गाडीचा नंबर दुसरा लावलेला आहे.
5 / 10
या गाडीला जी नंबर प्लेट लावलेली आहे ती जालन्यामध्ये समाज कल्याण विभागातील लिपिक विनय नाडे यांची आहे.नाडे यांनी गेल्या वर्षी 20 नोव्हेंबरला मारुती इको कार चोरीला गेल्याची तक्रार औरंगाबादमध्ये केली होती.
6 / 10
मीठी नदीतून ताब्यात घेण्यात आलेल्या डीव्हीआर आणि प्रिंटरच्या तपासाचा अहवाल सीएफएलच्या टीमने एनआय़एला दिला आहे. या रिपोर्टनुसार याच प्रिंटरमधून उद्योगपती मुकेश अंबानींना पाठविलेले धमकीचे पत्र टाईप करण्यात आले होते.
7 / 10
हे पत्र याच प्रिंटरमधून प्रिंट करण्यात आले होते. शिंदे यानेच सचिन वाझेच्या आदेशावरून 'प्रिय मुकेश भैया और नीता भाभी' असे धमकीचे पत्र टाईप केले होते. हे पत्र जिलेटिन ठेवलेल्या स्कॉर्पिओमध्ये सापडले होते.
8 / 10
फॉरेन्सिक टीमने डीव्हीआरबाबत सांगितले की, तो डीव्हीआर वाझे यांच्या साकेत सोसायटीचा आहे. वाझेच्या सांगण्यावरून एपीआय रियाझ काझीने तो काढून आणला होता.
9 / 10
अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात म्हटले आहे की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा.
10 / 10
मंगळवारी NIA ने कोर्टात म्हटलं की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरण