Sachin Vaze: NIA cracks down on 'Mystery Woman' who seen with Sachin vaze in Hotel
Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास? By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 8:05 AM1 / 10अँटेलिया स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलिसमधील निलंबित अधिकारी सचिन वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसलेल्या मिस्ट्री वुमनचा शोध लागला आहे. NIA ने गुरुवारी संध्याकाळी या महिलेला ताब्यात घेतलं आहे, जी १६ फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत दिसली होती. 2 / 10NIA टीमने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दक्षिण मुंबईतील एका हॉटेल आणि क्लबचा तपास केला. त्याशिवाय ठाणे येथील फ्लॅटमध्येही सर्च ऑपरेशन केले. त्याठिकाणी या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. 3 / 10माहितीनुसार, ही महिला मुख्य आरोपी सचिन वाझेची निकटवर्तीय आहे, तिला ताब्यात घेतलंय, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं, जी सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसली होती, ताब्यात घेण्यापूर्वी या महिलेची चौकशी करण्यात आली. 4 / 10NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही महिला सचिन वाझेचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती, ती दोन ओळखपत्रांचा उपयोग करत हे काम करत होती, आणि तिच्याकडे नोटा मोजण्याची मशीनही होती, जी मागच्या महिन्यात सचिन वाझेच्या मर्सिडीजमध्ये आढळली होती. 5 / 10१६ फेब्रुवारी रोजी सचिन वाझे दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसला होता, त्याच्यासोबत एक महिला आणि ५ मोठ्या बॅगा होत्या. या महिलेबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही, परंतु या ५ बॅगामध्ये सचिन वाझे पैसे भरून घेऊन जात होता. 6 / 10NIA अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास पथक बाबुलनाथ मंदिराशेजारील सोनी बिल्डिंगमध्ये एका हॉटेल आणि क्लबमध्ये पोहचलं. हॉटेलमधील लोकांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, छापेमारीवेळी तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. 7 / 10तपास पथक चौकशीनंतर त्याठिकाणाहून रवाना झाली, गावदेवी पोलीस स्टेशनचे काही अधिकारीही त्यांच्यासोबत होते, सचिन वाझे यालाही NIA पथक बाबुलनाथ परिसरात घेऊन आली होती, तर NIA च्या दुसऱ्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील मीरारोड येथे एका फ्लॅटवर धाड टाकली. 8 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, याच फ्लॅटवर एक महिला राहत होती आणि २ आठवड्यापासून फ्लॅट बंद होता, चौकशीनंतर या महिलेला संध्याकाळी विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. ही महिला सचिन वाझेची निकटवर्तीय असल्याची दाट शक्यता आहे. सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर ४०१ मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने भाड्यावर घेतली आहे. ही खोली गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.9 / 10मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटन स्फोटकांच्या गाडीनं प्रकरणात NIA चौकशीत सचिन वाझे अडकले, १३ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सचिन वाझेला तात्काळ निलंबित करण्यात आलं. NIA ने रविवारी सर्च ऑपरेशनवेळी मिठीनदीतून लॅपटॉप, प्रिंटर, दोन हार्ड डिस्क,२ वाहन नंबर आणि २ डीवीआर, सीपीयू बाहेर काढलं होतं, 10 / 10स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या प्रकरणात सचिन वाझेची भूमिका संशयास्पद आहे, NIA ला सचिन वाझेविरोधात सबळ पुरावे सापडत आहेत, ३ एप्रिलला सचिन वाझेची कोठडी संपत आहे, त्यावेळी वाझेला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications