शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sachin Vaze: सचिन वाझे नाही, बडी हस्ती कटाची खरी सूत्रधार; NIA लवकरच पोलखोल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 9:04 AM

1 / 10
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. या कटातील मुख्य सूत्रधार म्हणून मुंबई पोलिसांचे क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना अटक करण्यात आली आहे.
2 / 10
एनआयएने ही अटक केली आहे. वाझे वापरत असलेली मुंबई पोलिसांची इनोव्हा कार, एका व्यक्तीची मर्सिडीज कार देखील एनआयएने जप्त केली आहे. या कारमध्ये डायरी, बॅग आणि पाच लाख रुपये सापडले आहेत.
3 / 10
एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार या कटामागे सचिन वाझे खरे सूत्रधार नसून कोणी दुसराच व्यक्ती यामागे आहे. वाझेला याच व्यक्तीकडून आदेश मिळत होते. लवकरच या मोठ्या सूत्रधाराची पोलखोल केली जाणार आहे.
4 / 10
एनआयएला या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याची पटकथा लिहिली गेल्याचे मानले जात आहे.
5 / 10
13 मार्चला अटक झाल्यानंतर सचिन वाझेने एनआयएला आपणच प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि जुने नाव पुन्हा मिळविण्यासाठी कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्य़ावरून हा कट रचला होता, अशी कबुली दिल्याचे तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
6 / 10
वाझेंना हा कट करायला लावणारा दुसरा व्यक्ती कोण आहे हे अद्याप एनआयएने सांगितलेले नाही. परमबीर सिंहांची बदली झाल्याने तेच होते की आणखी कोण आहे य़ाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
7 / 10
वाझे यांचे टॉपचे अधिकारी परमबीर असल्याने संशयाची सुई त्यांच्याभोवती रेंगाळत आहे. मोठा वरदहस्त असल्यानेच वाझे डीसीपीसारख्या अधिकाऱ्यांना देखील जुमानत नव्हते. परमबीर यांना आयुक्त पदावरून हटविल्यानंतर ाता एनआयए त्यांना देखील चौकशीसाठी बोलविणार असल्याचे बोलले जात आहे.
8 / 10
एनआयएने स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि मर्सिडीज जप्त केली आहे. या प्रकरणी आणखी दोन गाड्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये आणखी एक मर्सिडीज कार आणि स्कोडा कार आहे.
9 / 10
दुसरीकडे जप्त केलेल्या मर्सिडीजचा मालक समोर आला आहे. त्याने ही कार ऑनलाईन सेंकंड हँड कार डीलर कंपनी कार24 ला ही कार विकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आपला काही सहभाग नाहीय, तपासात सहकार्य़ करणार असल्याचे सांगितले आहे.
10 / 10
रियाझ काझीची सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेतील सचिन वाझेंचा जवळचा सहकारी म्हणून रियाझ काझीला ओळखले जाते. त्यानेच वाझेंच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज नेले होते.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगMumbai policeमुंबई पोलीसMukesh Ambaniमुकेश अंबानी