Sachin Vaze: अटकेनंतर सचिन वाझेच्या खात्यातून 26.50 लाख रुपये कोणी काढले? NIA समोर गूढ वाढले By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 11:20 AM
1 / 10 मुंबई : एनआयए न्यायालयाने अँटिलिया केस (Antilia Case) आणि मनसुख हिरेन मर्डर केस (Mansukh hiren murder case) प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे निलंबित अधिकारी सचिन वाझे (SachinVaze) यांची कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढविली आहे. वाझे यांना 13 मार्चला अटक करण्यात आली होती. त्यांची कोठडी संपल्य़ानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. ( 26.50 lakhs withdrawal from SachinVaze's bank Account, when he is in NIA Custody.) 2 / 10 एनआयएने सचिन वाझे यांची आणखी सहा दिवस कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही बाजुंची सुनावणी ऐकून वाझेंना कोठडी वाढविली. 3 / 10 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले की, सचिन वाझेला 13 मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 18 मार्चला त्याच्या बँक खात्यातून 26.50 लाख रुपये काढण्यात आले होते. तपासात वाझेचे हे जॉइंट अकाऊंट होते हे समोर आले आहे. 4 / 10 सचिन वाझेने जॉईंट लॉकरदेखील उघडले होते. सिंह यांनी सांगितले की, या लॉकरमध्ये संशयस्पद वस्तूदेखील सापडल्या आहेत. याशिवाय 2 एप्रिलला आणखी एक मर्सिडिज कारदेखील जप्त करण्यात आली आहे. या कारचेदेखील धागेदोरे एनआयएना मिळवायचे आहेत. 5 / 10 अनिल सिंहांनी न्यायालयात हे देखील सांगितले की, वाझेचा सहकारी आरोपी विनायक शिंदेच्या घरातूनदेखील काही गंभीर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सचिन वाझेची चौकशी करायची आहे. 6 / 10 सचिन वाझेचे वकील आबाद पॉन्डा यांनी एनआयच्या कोठडीच्या मागणीला विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, वाझेला युएपीए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. अशात 15 दिवसांची कोठडी संपली आहे. 7 / 10 तपास यंत्रणेला महत्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये लॅपटॉप, डीव्हीआर, मोडतोड झालेला सीपीयूदेखील आहे. याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. 8 / 10 एनआयए मनसुख हिरेनच्या हत्येची चौकशीदेखील करत आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, सचिन वाझेला गुन्हा झाला त्या ठिकाणी पाहिले गेले होते. 9 / 10 वाझे हा हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्याला असताना त्याला भेटण्यासाठी वारंवार एक महिला आल्याचे तेथील हॉटेल व्यवस्थापनातील चौकशी व सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीतून स्पष्ट झाले होते. तपासानंतर संबंधित महिला मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये सी विंगमधील रूम नंबर ४०१ मध्ये राहत असल्याचे समाेर आले. गेल्या काही दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. मूळची गुजरातची असलेली ही महिला गुरुवारी परतल्यानंतर एनआयएने तिच्याकडे चौकशी सुरू केली. 10 / 10 सुमारे १३ तास तिची चाैकशी केल्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात आणले होते. रात्री उशिरा तिला सोडल्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बाेलावले. मुंबईतील विविध बार, लॉजेस, पार्लर व अन्य ठिकाणाहून जमा झालेल्या रकमेतील वाझेचा ‘वाटा’ मीना हाताळत होती. त्याच्या सांगण्यावरून तिने काही रक्कम गुंतवणूक करण्याबरोबरच हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. आणखी वाचा