सॅल्यूट लेडी सिंघम! पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिला शक्तिचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 21:23 IST
1 / 7महिला पोलिसांचा पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावळी त्यांना सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र आणि भेटवस्तू देण्यात आली आहे.2 / 7अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी तपासाची सेन्चुरी मारणाऱ्या मालवणी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उषा खोसे यांना गौरविण्यात आले. 3 / 7रायगड जिल्ह्यातील धामणी गावातील ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेल्या नायगाव सशस्त्र विभागातील पोलीस नाईक ५० मुलांना दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेहाना शेख यांच्यासारख्या २८ महिला पोलिसांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनाच्या काळात एकाच दिवशी चार मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या संध्या शिलवंत यांनाही यात गौरविण्यात आले.4 / 7आझाद मैदान पोलीस क्लब येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) एन. अंबिका, नियती ठाकर, सानप उपस्थित होते.5 / 7यात, महिला पोलिसांच नाही तर त्यांच्या कुटुंबियातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आहे. 6 / 7कोरोना महामारीच्या भयंकर काळात आणि गुन्हांचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या जिगरबाज महिला पोलिसांच्या पाठीवर आज महिला दिनी सन्मानाची थाप देण्यात आली. 7 / 7जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलीस दलातील या कर्तृत्ववान महिला पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.