शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तेच ठिकाण, तेच रेस्टॉरंट; १४ वर्षांपूर्वीही असेच घडलेले, सोनालीच्या मृत्यूने जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 1:56 PM

1 / 6
१४ वर्षांपूर्वी २००८ साली ब्रिटिश युवती स्कार्लेट ईडन किलिंग प्रकरणात गाजलेले हणजुण किनाऱ्यावरील शॅकवजा कार्लीज बार अॅण्ड रेस्टॉरंट हरियाणाच्या अभिनेत्री तथा भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या खुनामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
2 / 6
सोनाली ही मृत्यूपूर्वी काही तास या रेस्टॉरंटमध्ये होती. कर्लीज रेस्टॉरंटमधून सुधीर संगवान याच्यासोबत बाहेर पडतानाचे सोनालीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिला चालताना तोल सावरत नसल्याने ती संगवान याचा एका हाताने आधार घेत लटपटत रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
3 / 6
हणजुण पोलिसांनी रेस्टॉरंट मालक तसेच कर्मचाऱ्यांचे या प्रकरणी जबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, स्कॉर्लेट ही तिच्यावर लैंगिक अत्याचार होण्याच्या काही वेळआधी कर्लीज रेस्टॉरंटमध्ये होती, असा दावा त्यावेळी तिची आई फियोना हिने केल्याने तपासाची चक्रे या रेस्टॉरंटमधील तत्कालीन घडामोडींबोवतीच फिरत होती.
4 / 6
सोनाली हिच्या मृत्यूने आताही तेच रेस्टॉरंट पुन्हा तपासाचा केंद्रबिंदू ठरले आहे. सुधीर सांगवान व सुखविंदर वासी या सहकाऱ्यांनी सोनालीला याच रेस्टॉरंटमध्ये नेले होते. हरयाणामधील एक व्यक्ती या रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे, असं सांगून तिला येथे आणल्याचे सांगितले जाते.
5 / 6
कर्लीज रेस्टॉरंटमधून सोनाली थेट हॉटेलमध्ये गेल्या व तिथे रुमवर गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचा दावा मोहिंदर फोगाट यांनी केला आहे. कर्लीजचे मालक एडविन नुनीस यांनीही सोनाली यांनी इतरांसोबत रेस्टॉरंटला भेट दिल्याची कबुली दिली आहे.
6 / 6
सोनाली व त्यांचे सहकारी आपल्यासाठी इतर ग्राहकांसारखेच होते. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काय हवे, काय नको ते पाहिले आणि इतर ग्राहकांना आदरतिथ्याने सेवा देतो तशीच सेवा आम्ही त्यांना दिल्याचे एडविन यांनी सांगितले.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस