शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आर्यन खान क्रूझवर येणार याची समीर वानखेडेंना माहितीही नव्हती, जेव्हा समजले...; इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:15 PM

1 / 9
2 / 9
मुळात आर्यन खान येणार हे समीर वानखेडेंना माहिती नव्हते. वानखेडेंना गुजरातच्या पाटील नामक व्यक्तीने कार्डेलिया क्रूझवर पार्टी होणार असल्याचे कळविले होते. य़ा पार्टीत ड्रग्ज पार्टी देखील होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये काही मोठे व्यापारी आणि काही मोठ्या नावांचे लोक येणार आहेत, अशी टीप होती. तेव्हा आर्यन खान येणार असल्याची माहिती एनसीबीला नव्हती.
3 / 9
आर्यन खानसोबत फोटो काढून व्हायरल करणारा डिसुझा आणि पाटील हे एकमेकांना ओळखत होता. जेव्हा एनसीबी क्रूझवर रेड टाकण्याचा प्लॅन करत होती तेव्हा डिसुझाने वानखेडे आणि एनसीबीचे आणखी एक अधिकारी व्ही व्ही सिंग यांची दोन खासगी व्यक्ती भानुशाली आणि किरण गोसावी यांच्याशी ओळख करून दिली. एनसीबीच्या अधिकार्यांनी या दोघांना क्रूजवर बडा मासा पकडण्याचा टास्क दिला.
4 / 9
एनसीबीला आलेल्या टीपमधील नावानुसार २७ लोकांची लिस्ट बनविण्यात आली. परंतू, तितक्यात क्रूझवर आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत येत असल्याचे वानखेडेंना समजले आणि प्लॅनच बदलला गेला. या लिस्टमधून १७ नावे वगळण्यात आली आणि फक्त १०च ठेवली गेली.
5 / 9
आर्यन जेव्हा क्रूझवर आला तेव्हा त्याला पकडण्यात आले. त्याचा फोन ताब्यात घेण्यात आला. आजतकला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन आणि त्याचे चार मित्र क्रूझवर आले होते. परंतू फक्त अरबाझकडेच चरस सापडले. ड्रग्ज चॅट आर्यनच्या अन्य तीन मित्रांच्या मोबाईलमध्ये सापडले होते. परंतू, त्यांची नावे लिस्टमध्ये नसल्याने त्यांना सोडण्यात आले. या लिस्टमध्ये आर्यनचे नाव असल्याने त्याला टार्गेट करण्यात आले.
6 / 9
किरण गोसावी एनसीबी अधिकारी असल्याचे आर्यनला सांगण्यात आले. त्यानेच आर्यनला तिथून आणले, एनसीबी कार्यालयात आर्यनच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपवर शाहरुखला आर्यनचा ऑडिओ पाठविण्यात आला. यात , ''पापा मी एनसीबीच्या कस्टडीत आहे, मला मदत करा'', असा तो मेसेज होता.
7 / 9
आता डील सुरु करण्यासाठी वानखेडे कंपनीने गोसावी आणि आर्यनचा सेल्फी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला पाठविण्याचा निर्णय घेतला. हे सर्व शाहरुखपर्यंत पोहोचवायचे होते. यासाठी व्हिडीओ देखील काढण्यात आला होता. तो पाठविण्यात आला.
8 / 9
वानखेडे हे विरल रंजन नावाच्या एका व्यक्तीसोबत महागड्या घड्याळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. याची कोणतीही माहिती त्यांनी सरकारला किंवा त्यांच्या विभागाला दिली नाही.
9 / 9
वानखेडे यांच्या परदेशी प्रवासाचा हेतू त्यांनी नीट सांगितला नाही. परदेशी प्रवास खर्चात तपशीलदेखील चुकीच्या पद्धतीने सादर केला.
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खान