शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी जबाब नोंदवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 3:20 PM

1 / 7
राठोडांविरोधात पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्याला पोस्टाने तक्रार पाठवली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली असून उद्या खुद्द आमदार संजय राठोड यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
2 / 7
संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणी तक्रारदार महिलेचा जबाब आधीच घाटंजी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. संजय राठोड यांची बाजू ऐकल्यानंतर एसआयटी कमिटी दोन्ही जबाब तपासून अहवाल सादर करणार आहे.
3 / 7
संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर बोट दाखवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशी माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असे संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
4 / 7
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात देखील संजय राठोड यांचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
5 / 7
शिवसेना नेते संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार एका महिलेने केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
6 / 7
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात देखील संजय राठोड यांचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
7 / 7
बंजारा समाजातील एका २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्यानं अडचणीत आलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडYavatmalयवतमाळsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस