शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐकून बसेल धक्का! अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी टाकला दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 9:00 PM

1 / 9
इंतिसार अल हम्मादी असे या २० वर्षीय अभिनेत्रीचं नाव असून अपहणानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एका निवेदनातून याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
2 / 9
इंतिसार अल हम्मादी  हिचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं इंतिसारच्या वकिलांनी म्हटलं आहे.
3 / 9
२० फेब्रुवारीला येमेनची राजधानी असलेल्या सना इथून इंतिसारला हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासूनच ती येमेनमधील सनामध्ये सत्ता गाजवणाऱ्या हौथी या विद्रोही संस्थेच्या ताब्यात आहे.
4 / 9
दोन महिन्यांनंतर एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनात २० वर्षीय इंतिसारला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली, तिचा छळ करण्यात आला असून तिला ड्रग्सचं सेवनं आणि वेश्या व्यवसाय करत असल्याची कबुली देण्यास भाग पाडलं. त्यानंतर इंतिसारला ती कुमारिका असल्याचं सिद्ध करण्यासाठी कौमार्य चाचणी देण्यास दाबव टाकला जात असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे.
5 / 9
येमिनी-इथोपियन असलेल्या इंतिसारला हौथी बंडखोरांकडून अटक करण्यात आली होती. यमेनमध्ये बहुतांश भाग हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर सौदी अरेबियात पळ काढला आहे.
6 / 9
राजधानी सनावर या बंडखोरांचे वर्चस्व असून अपारंपिक म्हणजेच मॉर्डन कपडे परिधान करत असल्याने आणि अनेकदा मुस्लिम समजातील हिजाब परिधान न केल्याने इंतिसार अल हम्मादीला लक्ष्य केलं गेल्याचं एमनेस्टी इण्टरनॅशनलच्या निवेदनात म्हटले आहे.
7 / 9
दोन महिन्यांपूर्वीइंतिसारला रस्त्यावरून जात असताना अटक करण्यात आली. सना शहरात तिची गाडी थांबवून तिला ताब्यात घेण्यात आलं. गाडीत गांजा असल्याचा आरोप करत हौथीच्या सैन्य दलाने तिला अटक केली
8 / 9
एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेच्या दाव्यानुसार हम्मादीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत तिची चौकशी केली गेली. वर्णभेद करत तिचा अपमान करण्यात आला. त्याचप्रमाणे डोळ्यावर पट्टी असतानाच तिच्याकडू काही आरोपपत्रांवर जबरदस्तीने सही आणि अंगठ्याचा शिक्का घेण्यात आल्याची खळबळजनक माहिती सांगण्यात येत आहे.
9 / 9
हौथी बंडखोरांच्या सुरक्षा दलाने तिला १० दिवसांनंतर सनामधील मध्यवर्ती कारागृहातील महिला विभागात कैदैत ठेवले आहे. तसेच कुटुंबियांना आणि वकिलाला भेटण्यास तिला बंदी घालण्यात आली आहे. हौथी बंडखोरांकडून इंतिसारच्या वकिलांनी तिची केस सोडून द्यावी यासाठी धमक्या दिल्या जात आहेत.
टॅग्स :KidnappingअपहरणInternationalआंतरराष्ट्रीयArrestअटकjailतुरुंगDrugsअमली पदार्थ