धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 20:13 IST
1 / 6या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून पोलिसांनी पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.2 / 6हे प्रकरण बैतूल शहरातील आहे. एक अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होता, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कारा झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.3 / 6पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,३ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेअकराच्या सुमारास एक 14 वर्षीय अल्पवयीन अचानक घरातून गायब झाली. दुसर्या दिवशी तिच्या कुटूंबाने मिसिंग तक्रार 4 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविला, त्यावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि त्या अल्पवयीन मुलाचा शोध सुरू केला.4 / 6दरम्यान, ती अल्पवयीन 5 ऑगस्ट रोजी तिच्या घरी पोहचली, तिने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, 3 ऑगस्टच्या रात्री एका परिचित महिलेच्या घरी थांबली आणि 4 ऑगस्ट रोजी दिवसा फिरत होती. 5 / 6४- ५ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री पाच मुलांनी तिच्यावर रेल्वेच्या ओव्हरब्रिज आणि सदर भागाजवळील झोपडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. यानंतर पोलिसांनी गँगरेपसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून संशयाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले आहे.6 / 6या घटनेचे सत्य देखील समोर येत आहे की, आरोपीने पीडितेला आधी दारू पाजली, नंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसही या वस्तुस्थितीचा तपास करत आहेत. घटनेचे कोणतेही पैलू तपासात शिल्लक राहू नये यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडूनही या मुलीची चौकशी केली जात आहे.