'तुझ्या पतीची आत्मा माझ्या शरीरात येते', असं सांगून तांत्रिकाने विधवा महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:38 IST
1 / 8देशात रेपच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रोज देशाच्या वेगवेगळ्या भागातून रेपच्या धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या छोटा उदयपूरमधून समोर आली आहे. इथे एका तांत्रिकाने विधवा महिलेला फसवूण तिच्यासोबत रेप केला. पोलिसांनी तांत्रिकाला अटक केली. पुढील चौकशी सुरू आहे.2 / 8मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि तांत्रिकाचे पारिवारीक संबंध होते. सांखेडामध्ये राहणारं एक कपल मंदिरात जात होते. या दरम्यान त्यांची भेट आरोपी तांत्रिकासोबत झाली होती. दोघांमध्ये पारिवारीक संबंध तयार झाले. यानंतर तांत्रिक नेहमीच कपलच्या घरी जात-येत होता.3 / 8गेल्यावर्षी कोरोना महामारी दरम्यान महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही तांत्रिकाचं महिेलेच्या घरी येणं-जाणं सुरूच होतं. यादरम्यान महिलेला अंदाजही नव्हता की, तांत्रिकाची तिच्यावर वाईट नजर आहे.4 / 8तेच यावर्षी जानेवारी महिन्यात महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. तांत्रिकाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो महिलेला म्हणाला की, तू माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर रहा. ज्याने परिवारातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होणार नाही. महिलेने तांत्रिकाचं म्हणणं ऐकलं आणि ती त्याच्या घरी राहू लागली होती.5 / 8यादरम्यान एक दिवस संधी मिळताच आरोपी तांत्रिक महिलेच्या रूममध्ये गेला आणि त्याने तिच्यावर रेप केला. आरोपीने महिलेला सांगितलं की, तुझ्या पतीची आत्मा माझ्या शरीरात येते. पण आरोपी आधीच विवाहित होता. तरीही तो महिलेला लग्नासाठी जबरदस्ती करू लागला होता.6 / 8अशात महिला इतकी वैतागली होती की, तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. अखेर महिला पोलिसांकडे गेली आणि आरोपी विरोधात रेपचा गुन्हा दाखल केला. 7 / 8याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आरोपी एका मंदिरात पुजारी आहे आणि तो तांत्रिकाचं कामही करतो. त्याने महिलेला फसवून तिच्यावर रेप केला.8 / 8गुजरातमध्ये २०२० च्या तुलनेत रेपच्या घटना वाढल्या आहेत. क्राइम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार, २०२० च्या तुलनेत राज्यात रेपच्या घटना १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यात एकूण ४९३ केसेस दाखल झाल्या होत्या. सूरतमध्येही रेपच्या घटना वाढल्या असून दुप्पट झाल्या आहेत.