Shocking! Live in Boyfriend murdered Girlfriend in Haryana
धक्कादायक! लिव्ह-इनमद्ये राहणाऱ्या प्रेयसीवर चाकूने केले सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 5:02 PM1 / 5हरयाणातील हिसारच्या आदमपूरमध्ये इंदिरा कॉलनीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तिची चाकूने वार करत हत्या केली. पोलिसांनी मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून तरूण सुनील विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. 2 / 5आदमपूरच्या जवाहर नगरात राहणाऱ्या इंद्राच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक महिलेची आई इंद्राने पोलिसांना सांगितलं की, तिच्या मुलीलं लग्न पंजाबच्या दीननगरमधील एका व्यक्तीसोबत झालं होतं. दोघांमध्ये वाद होत असल्याने आणि त्यांचं न पटल्याने ते वेगळे झाले. त्यानंतर ती माझ्याकडे येऊन आदमपूर येथील घरी राहू लागली होती.3 / 5आदमपूरच्या लाइनपार भागात राहणाऱ्या सुनीताचं १२ वर्षाआधी पंजाबमध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर तिला तीन मुलं झाली आणि पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर सुनीता आदमपूरमधील सुनीलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली होती.4 / 5सुनीताच्या आईने सांगितलं की, रात्री उशीरा सुनीता मुलीसोबत रामलीला बघण्यासाठी गेली होती. ती रामलीला बघून परत येत होती. त्यावेळीच जवाहर नगर भागात सुनीलने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ज्यात ती गंभीरपणे जखमी झाली. नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.5 / 5मृत महिलेची आई इंद्राने आरोप लावला की, सुनीतासोबत राहणाऱ्या तिचा प्रियकर सुनील यानेच तिची हत्या केली. पोलिसांच्या सूत्रानुसार, प्रेयसीला मारल्यानंतर प्रियकराने आपलाही जीव देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आलं नाही. पोलिसांनी सुनीला विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. मृत महिलेच्या शरीरावर १५ ठिकाणी चाकूचे निशाण आढळून आले. आणखी वाचा Subscribe to Notifications