शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 8:58 AM

1 / 10
दिल्लीच्या श्रद्धा वाकर हत्याप्रकरणासारखेच हत्याकांड बंगळुरू इथं घडले आहे. याठिकाणी पतीपासून विभक्त झालेल्या एका महिलेचा मृतदेह संशयास्पद रित्या तिच्या राहत्या घरी आढळला. या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले. १९ दिवसांपर्यंत खोली बंद होती. त्यानंतर प्रचंड दुर्गंधी पसरली तेव्हा शेजाऱ्यांनी घरमालकाला या घटनेबाबत कळवले.
2 / 10
घरमालकाने या महिलेच्या आई आणि बहिणीला बोलावून १९ दिवस बंद असलेल्या घरचा दरवाजा उघडला. तेव्हा जमिनीवरील रक्ताचे डाग, मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे पाहून आणि फ्रिज उघडताच प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. त्यात घरमालकाने पोलिसांना घटनेची माहिती देऊन तातडीने बोलावले. पोलिसांनीही डबलमास्क लावून घरात प्रवेश केला आणि समोरील दृश्य पाहून हादरले.
3 / 10
पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दुर्गंध इतका प्रचंड होता जो जातच नव्हता. फ्रिजचा दरवाजा उघडाच होता आणि समोर सर्वकाही दिसत होते. फ्रिजच्या वरच्या बाजूस मानवी मृतदेहाचे २ पाय, मधल्या भागात अन्य तुकडे आणि सर्वात खालच्या भागात एक मुंडकं ठेवले होते, जे महालक्ष्मीचं होते. महालक्ष्मी एकटी भाड्याने खोली घेऊन राहत होती. १९ दिवसांपासून तिच्याशी कुणाचा संपर्क नव्हता.
4 / 10
महालक्ष्मीचा मारेकरी कोण? - मृतदेहाचे तुकडे समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तपासात महालक्ष्मीच्या बेडजवळ एक मोबाईल सापडला. ज्याचे सीडीआर तपासले गेले. त्यात २ सप्टेंबरला महालक्ष्मीला अखेरचा कॉल आला होता. २ सप्टेंबरनंतर या मोबाईलवरून ना कॉल केला गेला, ना कॉल उचलला गेला. त्यामुळे महालक्ष्मीची हत्या २ किंवा ३ सप्टेंबरमध्ये केली असावी असा अंदाज पोलिसांना आला. इतक्या निर्दयी आणि क्रूरपणे महालक्ष्मीला कुणी मारले? तिचा शत्रू कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.
5 / 10
२०२३ साली पतीपासून विभक्त - २०१९ पर्यंत महालक्ष्मी आणि तिचे कुटुंब नेपाळमध्ये राहत होते. त्याचवर्षी नेपाळच्या हेमंत दाससोबत तिचं लग्न झाले. लग्नानंतर ते दोघे नेपाळहून बंगळुरूत आले. हेमंत मोबाईल शॉपीत काम करायचा तर महालक्ष्मी ब्यूटी शॉपमध्ये सेल्स वूमन होती. दोघांनी भाड्याने खोली घेतली. त्यानंतर दोघांना एक मुलगी झाली. २०२३ पर्यंत सर्वकाही ठीक होते, मात्र त्यानंतर हेमंत आणि महालक्ष्मी विभक्त झाले. मुलगी वडिलांसोबत राहत होती. दर १५ दिवस अथवा महिन्यातून एकदा ती मुलीला भेटायला हेमंतच्या घरी जायची.
6 / 10
महालक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय - तपासात हेमंत आणि महालक्ष्मी यांच्यात लव्ह ट्रायंगल समोर आलंय. उत्तराखंडमध्ये राहणारा हेअर ड्रेसर अशरफ आणि महालक्ष्मी यांच्यात अफेअर होते, त्यावरून हेमंत आणि महालक्ष्मीत भांडणे व्हायची. या भांडणातून गेल्या ९ महिन्यापासून महालक्ष्मी पती हेमंतपासून दूर राहत होती. काही महिने आई आणि बहिणींसोबत ती राहिली त्यानंतर ५ महिन्यापूर्वी ती भाड्याच्या घरात शिफ्ट झाली. महालक्ष्मी जिथं राहायची तिथे शेजाऱ्यांमध्ये मिसळत नव्हती. दररोज सकाळी ती घरातून बाहेर जायची आणि रात्री उशिरा घरी यायची. अनेकदा एक अज्ञात व्यक्ती महालक्ष्मीला घरातून पिकअप आणि ड्रॉप करायला यायचा. मात्र तो कोण याची माहिती कुणाला नाही. पोलीस हा व्यक्ती कोण याचा शोध घेतायेत.
7 / 10
पती आणि हेअर ड्रेसरची चौकशी - पोलिसांनी या प्रकरणी महालक्ष्मीचा पती हेमंत दास आणि हेअर ड्रेसरचीही चौकशी केली त्यानंतर महालक्ष्मीच्या हत्येत या दोघांचा काही हात नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून आले. या दोघांचे कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन तपासले असता २ ते १९ सप्टेंबर काहीच संशयास्पद आढळलं नाही.
8 / 10
CCTV व्हिडिओची पडताळणी - ज्या घरात महालक्ष्मी राहायची तिथल्या इमारतीच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस पडताळणी करत आहेत. या घटनेच्या दिवशी कुणी अज्ञात इमारतीत प्रवेश करतोय का हो पोलीस शोधतायेत. ज्याप्रकारे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे केलेत ते पाहून गुन्हेगाराने थंड डोक्याने हे सर्व केल्याचा संशय आहे. त्याने शांतपणे घरात मृतदेहाचे तुकडे केले. कदाचित मृत्यूपूर्वी महालक्ष्मीला झोपेच्या गोळ्या अथवा नशेचे औषध दिले असावे त्यानंतर तिचा खून करून मृतदेहाचे तुकडे केले असावे असं पोलिसांना वाटते सध्या सर्व गोष्टींचा पोलीस शोध घेत आहेत.
9 / 10
तो अज्ञात कोण? - महालक्ष्मीच्या मोबाईल कॉल डिटेल्सची संशयाची सुई अज्ञाताच्या दिशेने वळते. पोलिसांना त्या अज्ञाताचा शोध लागला, त्याचे नावही समजले. महालक्ष्मीच्या हत्येनंतर तो भूवनेश्वरमार्गे पश्चिम बंगालला गेला. पोलिसांना अद्याप त्याच्या नावाचा खुलासा केला नाही जेणेकरून तो अलर्ट होईल. एकदा तो व्यक्ती ताब्यात आला तर सर्व प्रश्नांची उकल होण्याची शक्यता पोलिसांना वाटते.
10 / 10
२०२२ मध्ये दिल्लीत श्रद्धा वाकर हत्येसारखी बंगळुरुतील ही घटना आहे. महालक्ष्मीच्या हत्येनंतर १९ दिवस तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले गेले. दिल्लीत श्रद्धाबाबतीत असेच घडले. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब जवळपास महिनाभर श्रद्धाचे तुकडे टप्प्याटप्प्याने बाहेर जंगलात फेकून देत होता. श्रद्धा लिव्हमध्ये राहायची तर महालक्ष्मी विवाहित होती परंतु पतीपासून विभक्त झाली होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी