शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला आता घ्यायचंय उच्च शिक्षण; मागितली पेन्सिल अन् वही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 5:03 PM

1 / 12
श्रद्धा वालकर हत्येप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आणि आता तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने साकेत कोर्टात एक अर्ज दाखल केला आहे. त्याने कोर्टाकडून त्याचे एज्युकेशन सर्टिफिकेट मिळावे, मोठी अशी मागणी केली आहे.
2 / 12
आफताबने यासोबतच उच्च शिक्षणासाठी आपल्याला पेन्सिल, कोरी वही उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. सध्या आफताब पूनावाला यांची सर्व कागदपत्रे दिल्ली पोलिसांकडे आहेत. पोलीस या प्रकरणाता अधिक तपास करत आहेत.
3 / 12
श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आणि हत्येचा आरोपी आफताबचे वकील एमएस खान यांच्या वतीने साकेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आफताबला एज्युकेशन सर्टिफिकेट आणि संबंधित पुस्तके द्यावीत, जेणेकरून तो शिक्षण पूर्ण करू शकेल, असे याचिकेत म्हटले आहे.
4 / 12
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची सॉफ्ट कॉपीही आफताबला देण्यात आली आहे. याचिकेत आफताबच्या वकिलाने त्याला दिलेले आरोपपत्र योग्य पद्धतीने असावे असे म्हटले आहे. सोबत पेन-पेन्सिल, वही द्यावी, जेणेकरून त्याला नोट्स काढता येतील असंही म्हटलं आहे.
5 / 12
श्रद्धा मर्डर केसमध्ये यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारीला 6629 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये हत्येशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करण्यात आला होता. पोलिसांनी 100 साक्षीदारांची यादीही दाखल केली.
6 / 12
आफताबने 18 मे रोजी त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली होती. यानंतर त्यांनी श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने 300 लिटरचा फ्रीज आणला होता. पोलिसांनी आफताबला अटक केली आणि मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाची हाडे जप्त केली. आफताब नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे.
7 / 12
पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबद्दल खेद व्यक्त केला होता. हत्येचे कारण छोट्या गोष्टीवरून भांडण असल्याचे सांगितले. हत्येच्या दिवशी 18 मे 2022 रोजी मुंबईला जाण्याचा दोघांचा प्लॅन होता पण अचानक आफताबचे तिकीट रद्द झाले आणि दोघांमध्ये खर्चावरून भांडण झाले. त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
आफताबने मृतदेह हिमाचल प्रदेशात नेऊन लपवण्याचा कट रचला. त्याने विचार केला की आपण श्रद्धाचा मृतदेह एका बॅगमध्ये टाकून हिमाचलला नेऊन मृतदेह तिथे ठेवू. यानंतर आरोपी आफताब अमीन हा पूनावाला मार्केटमध्ये गेला आणि तेथून 1200 रुपये किमतीची काळ्या रंगाची मोठी बॅग विकत घेतली.
9 / 12
आफताबने काही ट्रॅव्हल एजंटला बोलावून कॅब बुक करण्यासाठी त्यांच्याशी बोलणे सुरू केले. पण त्याचवेळी आरोपी आफताबने विचार केला की, मृतदेह बॅगेत भरून कॅबमध्ये नेला तर दिल्लीहून हिमाचल प्रदेशला जात असताना महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तपासणी केली जाते.
10 / 12
अशा परिस्थितीत आफताबची ही योजना अयशस्वी होऊ शकते. असा विचार करून आफताबने हा प्लॅन रद्द केला. त्यानंतर आफताबने ठरवले की तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जंगलात फेकून देईल. आफताबने त्याच रात्री फ्लॅटच्या बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले.
11 / 12
एकीकडे श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला आणि दुसरीकडे त्याने श्रद्धाचा मोबाईल फोन वापरून श्रद्धाला लोकांमध्ये जिवंत ठेवलं तपासात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब श्रद्धाचा मोबाईल वापरत असल्याचे निष्पन्न झाले.
12 / 12
श्रद्धाच्या मोबाईलवर कॉल आला तर आफताब तो कॉल रिसिव्ह करून निघून जायचा, आफताबने विचार केला की, येत्या काही दिवसांत खून प्रकरणाचा उलगडा झाला आणि तपास पथकाने श्रद्धाचा मोबाईल शोधला तर श्रद्धा जिवंत आहे हे सर्वांना समजावे.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर