शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shraddha Walker Murder Case : "...म्हणून मी संतापलो अन् श्रद्धाची हत्या केली"; नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:31 PM

1 / 11
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे. श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
2 / 11
नार्को चाचणीदरम्यान आफताबने डॉक्टरांच्या टीमला सांगितले की, श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. याशिवाय आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसे केले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली हे देखील सांगितले.
3 / 11
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी आफताबला विचारले की त्याने श्रद्धाचे शिर कुठे लपवले आहे, तेव्हा तो ते ठिकाण सांगू शकला नाही. त्याने शिर नक्की कुठे लपवलं होतं हे त्याला आठवत नव्हतं. रोहिणी येथील आंबेडकर रुग्णालयात गुरुवारी दोन तास त्याची नार्को चाचणी चालली.
4 / 11
नार्कोदरम्यान दोन डॉक्टर, एक मानसशास्त्रज्ञ आणि दोन फोटो एक्सपर्टसह 5 लोक उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्को चाचणीदरम्यान आफताब अनेकवेळा बेशुद्ध झाला. तज्ज्ञांच्या मते, सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन आणि सोडियम एमायटल सारखी औषधे नार्को टेस्टमध्ये दिली जातात, जी व्यक्तीला भूल देण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घेऊन जातात.
5 / 11
औषधांच्या परिणामामुळे आफताब बेशुद्ध झाला. बेशुद्ध पडल्यावर त्याला टॅप करून उठवायचे होते. खटल्यानंतर, आरोपीला कारागृहात परतण्यापूर्वी दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आफताबला या प्रकरणाशी संबंधित 20-25 प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यात तो केवळ गुन्ह्यात सहभागी होता का, याचा समावेश होता.
6 / 11
आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? त्याने तिचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले आणि शरीराचे विविध अवयव कुठे फेकले. आफताबचे जबाब हे पोलीस आणि पॉलीग्राफ चाचणीत झालेले खुलासे यांच्याशी जुळत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने सांगितलं होतं.
7 / 11
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आफताबला विचारण्यात आले की त्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरचे शिर कुठे फेकले? त्यावर त्याने पोलिसांना आधीच सांगितलं आहे असं उत्तर दिलं. त्याने श्रद्धाचे कपडे, तिचा फोन आणि वापरलेलं एक हत्यार फेकून दिल्याचं सांगितलं. नात्यातील कटुता आणि घरातील खर्च हे श्रद्धा आणि आफताब यांच्यातील भांडणाचं मुख्य कारण होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
8 / 11
आफताबबाबत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर तो 12 महिलांच्या संपर्कात होता. यातील काहीजणी त्याच्या फ्लॅटवरही आल्या होत्या. पोलिसांनी आतापर्यंत अशा 12 महिलांचे जबाब नोंदवले आहेत. आफताबने ज्या महिलेला श्रद्धाची अंगठी दिली होती, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
9 / 11
मानसशास्त्रज्ञ असलेल्या महिलेशी आफताबची ओळख डेटिंग एपच्या माध्यमातून झाली होती. मे महिन्याच्या अखेरीस दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. या महिलेने ऑक्टोबरमध्ये दोनदा छतरपूर येथील घराला भेट दिली होती जिथे श्रद्धाची हत्या करण्यात आली होती. त्य़ावेळी नेमकं काय घडायचं हे महिलेने सांगितलं आहे.
10 / 11
पोलिसांना दिलेल्या माहितीत महिलेने सांगितले आहे की, जेव्हा ती आफताबला त्याच्या फ्लॅटमध्ये भेटली तेव्हा तो पूर्णपणे नॉर्मल आणि आनंदी दिसत होता. तिने सांगितले की, जेव्हा श्रद्धाची हत्या उघडकीस आली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. ज्या घरामध्ये ती आफताबला भेटायला गेली होती त्याच घराच्या फ्रीजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवून ठेवले होते.
11 / 11
महिलेने सांगितले की आफताबच्या फ्लॅटमध्ये अनेक परफ्यूम आणि डीओ आहेत. त्याने तिला त्याची एक बाटलीही भेट दिली होती. तो सतत सिगारेट ओढत होता पण त्याच बरोबर मला सिगारेट सोडायची आहे असेही सांगत होता. तसेच आफताबने तिला सप्टेंबरमध्ये मुंबईला जाणार असल्याचे सांगितले होते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर