shraddha murder case sensational revealing of shraddha new chat i will not be able to work today
Shraddha Murder Case :'मारहाणीमुळे अंथरुणावरून...; श्रद्धाच्या नव्या चॅटमधून खळबळजनक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 8:51 AM1 / 11श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी आता आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. श्रद्धा वालकरच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून तिच्यासोबत झालेला क्रूरपणा उघड झाला आहे. श्रद्धा आणि एक मित्र यांच्यातील चॅटमध्ये हे उघड झाले आहे. 'आफताबने मला इतकी मारहाण केली आहे की, मी उठू शकत नाही. त्यामुळेच काम करता येत नाही' असं श्रद्धाने या चॅटमध्ये म्हटले आहे.हे चॅट 24 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहेत. 2 / 11यामध्ये ती बरी नसल्याबद्दल बोलत आहे. यावेळी आफताबने तिला मारहाण केल्याचे तिने सांगितले आहे. श्रद्धा पुढे चॅटमध्ये सांगते की, ती घरी गेल्यापासून सर्व काही ठीक आहे आणि ती आता बाहेर जात आहे. तिने पुढे चॅटमध्ये लिहिले की, मी आज काम करू शकणार नाही, कारण कालच्या भांडणामुळे बीपी कमी झाला असावी, असंही यात म्हटले आहे. 3 / 11'कालच्या मारहाणीमुळे माझे माचे शरीर दुखत आहे. अंथरुणावरून उठण्यासाठी शरीरात उर्जा उरलेली नाही' असंही तिने मेसेजमध्ये म्हटले आहे. यात तिने तिच्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आणि कामाच्या नुकसानीबद्दल दिलगीर व्यक्त केली आहे.4 / 11पण, हे चॅटींग कधी झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा काही गप्पाही समोर आल्या आहेत ज्यात श्रद्धाने भांडणाची बाब लपवली आहे.5 / 11मित्र लक्ष्मणसोबत बोलताना श्रद्धा तिच्या दुखापतीबद्दल सांगत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या अनेक खुणा होत्या. श्रद्धाने तिच्या चेहऱ्याचा फोटो तिच्या मित्रांना पाठवला होता.6 / 11यासोबतच श्रद्धा आणि तिच्या मित्रामध्ये झालेले चॅटींगही समोर आले आहे. हे चॅट डिसेंबर 2020 चे आहे, यावेळीही आफताबने श्रद्धाला मारहाण केली होती.7 / 11या गप्पांमध्ये महिला मंडळातील तक्रारींवर चर्चा होत आहे. यावेळी श्रद्धा तीन दिवस रुग्णालयात दाखल होती. हे आरोप त्याच्या मित्रांनी केले आहेत.8 / 11या चॅटमध्ये तिने महिला मंडळातील तक्रारींवर चर्चा केली आहे. यावेळी श्रद्धा तीन दिवस रुग्णालयात दाखल होती. हे आरोप तिच्या मित्रांनी केले आहेत.9 / 11हे चॅटींग कधीच आहे हे समोर आलेले नाही. श्रद्धा तिच्या नाकावर झालेल्या दुखापतीबद्दल मित्राला सांगत आहे. खाली पडल्याने नाक फ्रॅक्चर झाल्याचे तिने सांगितले.10 / 11श्रद्धा गांजाच्या नशेवरुन आफताबला शिवीगाळ करायची. दिल्ली पोलिसांच्या तपासात आरोपी गांजाच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. आफताब गांजा व इतर अमली पदार्थ कोठून आणायचा, याचा तपास पोलीस करत आहेत.11 / 11न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला ५ दिवसांत आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications